पालकमंत्री : अभियंता दिन समारोह उत्साहात अमरावती : राज्याला विकसित राज्याचे रूप देण्याकरिता अभियंते व उद्योजकांनी आपापली जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स अमरावती लोकल सेंटर व इंडियन वॉटरवर्क असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने देशातील अभियंत्यांचे आराध्य दैवत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता भवनात आयोजित अभियंता दिन समारोहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभियंता आयईआय अमरावती लोकल सेंटरचे अध्यक्ष एन. जे. बांबल होते. आयईआयचे अध्यक्ष सतीश बहाले, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ढंगारे, मुख्य अभियंता तुंगे, गणेश गोखले, सहसंचालक शिंगाडे, इंडियन वॉटर वर्क असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत काळेले उपस्थित होते. संचालक, प्रफुल्लकुमार काळे यांचे ‘इंजिनिअरींग चॅलेंज फॉर नॉलेज इरा’ या विषयावर मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक प्रदीप कोल्हे यांनी केले.
अभियंते-उद्योजक मिळून विकसित राज्य घडवू
By admin | Updated: September 18, 2015 00:19 IST