शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याअखेर पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत

By admin | Updated: July 20, 2016 00:09 IST

आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत.

प्रशासनात हालचाली : १४ पंचायत समितीसाठी निघणार ड्रॉ अमरावती : आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे आरक्षण तातडीने काढण्याचे निर्देश २२ जून रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्राव्दारे कळविले आहे. मात्र याला एक महिना होत असतानाही याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नव्हती. याबाबत 'लोकमत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करताच जुलै महिन्याचे शेवटी ही सोडत काढली जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.१४ पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका होत असल्याने राजकीय पुढारी कामाला लागले आहेत. तर प्रशासनानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीच्या एकत्र निवडणुका होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढली आहे. मात्र पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत अद्याप निकाली काढली नाही. २२ जून रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत तातडीने काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने याची अंमलबजावणी केली नव्हती याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधताच निवडणूक विभागाचे वतीने पंचायत समिती सभापती पदाची सोडत जुलै महिन्याच्या शेवडच्या किंवा आॅगस्ट महिन्याचे पहिल्या आठवडयात सोडत काढण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे लक्ष लागून असलेल्या या विषयाचा तिढा सुटणार आहे. (प्रतिनिधी)ग्रामविकास विभागाचे सभापती आरक्षण सोडतीबाबत अद्याप सूचना मिळाल्या नाहीत. या सूचना मिळताच साधारणपणे ही सोडत चालू महिन्याअखेरीस काढली जाण्याची शक्यता आहे.- राम सिध्दभट्टी, नोडल अधिकारी निवडणूक विभाग