शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जिल्हा परिषद मालकीच्या ई- क्लास जमिनींवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 18:18 IST

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या मालकीच्या ई-क्लास जमिनींवर अतिक्रमण असताना ते काढण्याचे धारिष्ट्य मुख्यकार्यपालन अधिकारी अथवा कोणतेही पदाधिकारी दाखवत नाही.

गणेश वासनिक अमरावती : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या मालकीच्या ई-क्लास जमिनींवर अतिक्रमण असताना ते काढण्याचे धारिष्ट्य मुख्यकार्यपालन अधिकारी अथवा कोणतेही पदाधिकारी दाखवत नाही. त्यामुळे ही बाब सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असून यात दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. ई-क्लास जमिनींचा लेखाजोखा ठेवण्यातही प्रशासनाची अनास्था आहे.सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०११ रोजी सिव्हील अपिल क्रमांक ११३२/२०११ जनहित याचिकेवर दिलेल्या निकालात गावकºयांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीकडे विहित केलेल्या जमिनी तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी महसूल व वनविभागाने १२ जुलै २०११ रोजी शासन निर्णयानुसार सार्वजनिक वापरातील जमिनी, गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालणे व अतिक्रमण निष्कासित करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मात्र, राज्यात ३४ जिल्हा परिषदांमध्ये स्वत:ची मालकी तथा दानशूर व्यक्तिंनी शाळांना दिलेल्या लाखो एकर जमिनी असताना त्यांची महसूल दफ्तरी जिल्हा परिषदांनी आपल्या नावे करून घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ई-क्लासच्या जमिनी जिल्हा परिषदांच्या असतानाही महसूल विभाग मनमर्जीने या जमिनींची विल्हेवाट लावत असल्याचे वास्तव आहे. यात काही ई-क्लास जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. भविष्यात या अतिक्रमित जमिनी जिल्हा परिषदांना परत मिळणार की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. तथापि, ग्रामविकास विभागाच्या ४ डिसेंबर २०१० रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी जमिनींवरील अतिक्रमण काढण्यासाठी एकूण १० सूचना दिल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदांच्या ई-क्लास जमिनींवर अतिक्रमण काढण्यासाठी सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा सभापतींनी पुढाकार घेतला नाही. ई-क्लास जमिनी मालकीच्या असताना जिल्हा परिषदांच्या अफलातून कारभारांमुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. शासनाच्या मालमत्तेचे नुकसान होत असेल तर संबंधित अधिकारी, पदाधिकाºयांवर कारवाईची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे.          वित्तीय सल्लागार करतात तरी काय?     जिल्हा परिषदांच्या मालमत्तांचे दुरूपयोग होत असेल तर लोकल फंड आॅडिट हे जिल्हा परिषदांचे वित्तीय सल्लागार म्हणून कार्यरत असताना या यंत्रणेने ही बाब शासनाच्या लक्षात का आणून दिली नाही, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. ई-क्लास जमिनींचे नियमबाह्य हर्रास, वापर, अतिक्रमण आदी बाबी लोकल आॅडिट फंडच्या लक्षात का आल्या नाहीत. त्यामुळे वित्तीय सल्लागाराचे लोकल आॅडिट फंड खरेच कर्तव्य बजावतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.           जिल्हा परिषदांच्या ई-क्लास जमिनी आहेत, हे नुकतेच कळले आहे. त्यामुळे ई-क्लास जमिनी, शाळांचा वापर आणि लागवाडीसाठी दिलेल्या जमिनींचा लेखाजोखा घेऊ. महसूल विभागाच्या ताब्यातील ई-क्लास जमिनी पुन्हा जिल्हा परिषदांच्या नावे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद अमरावती