कारवाई : शासकीय अभिन्यासातील १० जागांनी घेतला मोकळा श्वासधारणी : शहरातील शासकीय अभिन्यासातील १० ठिकाणचे अतिक्रमण गुरूवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. यासाठी खासगी जेसीबी, ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. तहसील कार्यालय व नगरपंचायत कार्यालयाने कडक पोलीस बंदोबस्तात गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून या कार्यवाहीला प्रारंभ केला. अवघ्या दीड तासात कच्ची, टिनपत्र्यांची घरे जमीनदोस्त करून मालमत्ता ताब्यात घेण्यात आली.या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत उपविभागीय अधिकारी षणमृगराजन एस., तहसीलदार संतोष कणसे, नायब तहसीलदार कहारे, मंडळ अधिकारी गिरी, सावरकर, तलाठी यादव, आरुळकर, मालवीय, मुरले, भलावी, फुलमाळी, बेलवंशी, उईके, शेलेकर, तायडे, संतापे, सुरळकर, ठाणेदार सुधीर पाटील, एपीआय सोनवणे, अमीन शेख यांचेसह मोठ्या संख्येने महसूल, पोलीस व नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायत उपाध्यक्ष रेखा पटेल यांना उपोषण करावे लागले होते. त्यावेळी सात दिवसांत अतिक्रमण काढण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता गुरूवारी करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांसह बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. (तालुका प्रतिनिधी)अतिक्रमणधारक महिलेने घातला वाद कारवाईदरम्यान अतिक्रमणधारक महिला सीमा सोनी यांनी तहसीलदार कणसे यांच्याशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदारांनी तिला ताब्यात घेण्याच्या सूचना महिला पोलिसांना केल्याने वाद संपुष्टात आला. हे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईमुळे आता मुख्य मार्ग, बसस्थानक व सर्वे नंबर १२६ मधील अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले
By admin | Updated: March 18, 2016 00:20 IST