शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीत अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:06 IST

वडाळी ते पोलीस आशियाना क्लब मार्ग स्थित महसुलच्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी पोलीस संरक्षणात हटविण्यात आले.

ठळक मुद्देतणाव : शेकडो नागरिकांचा तीव्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी ते पोलीस आशियाना क्लब मार्ग स्थित महसुलच्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी दुपारी पोलीस संरक्षणात हटविण्यात आले. अतिक्रमण हटविताना शेकडो नागरिकांनी विरोध केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस ताफामुळे गर्दी पांगविण्यात यश मिळाले.वडाळी परिसरातील महसूल विभागाची तीन हेक्टर जागा हमीद चौरसिया व दिगांबर गडपाल यांनी काही वर्षांपूर्वी भाडेपट्ट्यावर घेतली होती. त्यांनी काही दिवस विटभट्टी चालविली. मात्र करार संपल्यानंतर ती जागा मोकळी करण्यात आली. दरम्यान दोन वर्षांपासून शहरातील विटभट्टीला परवानगी नसल्यामुळे ती जागा मोकळीच होती. मात्र, आजूबाजुच्या परिसरातील काही नागरिकांनी महसुलच्या त्या जागेवर बाशे व बल्ला टाकून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेकांनी त्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार शुक्रवारी तहसीलदारांना प्राप्त झाली. अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी शुक्रवारी पोलीस संरक्षणात धाड टाकली असता तेथील शेकडो नागरिकांनी विरोध केला. अतिक्रमण काढताना विरोध करताना महिलांचा मोठा सहभाग होता. अनेक नागरिकांनी दोºया बांधून आपआपली हद्द आखून जागेवर अतिक्रमण केले. नागरिकांचा विरोध वाढत असल्याचे पाहून क्युआरटी पथकासह महिला पोलीस पथक घटनास्थळी पोहाचले. पोलिसांनी नागरिकांना पिटाळून लावण्याचे प्रयत्न सुरु केले असता नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाली. ७० ते ८० नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्याविरोधामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ती जागा चौरसियाकडून ४० हजारात खरेदी केल्याचे नागरिकांनी तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांना सांगितले. मात्र, ती जागा महसुलचीच असल्याचे तहसीदारांनी जाहीर स्वरुपात नागरिकांना सांगितले. सरकारी मालमत्ता कोणाला विकता येत नाही. त्यावर अतिक्रमण करता येत नाही. पैसे घेऊन जागा खरेदी केली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा, त्यावर पोलीस कारवाई करतील , असा सल्ला तहसीलदारांनी नागरिकांना दिला.अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवेळी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत, एसीपी डोंगरदिवे, फे्रजरपुरा प्रभारी ठाणेदार कुळकर्णी, एपीआय इंगळे, रवि राठोड यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता.