शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

वलगावच्या बस स्थानकावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

अमरावती : वलगाव येथील किरकोळ व्यावसायिकांनी, तसेच फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...

अमरावती : वलगाव येथील किरकोळ व्यावसायिकांनी, तसेच फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने स्थानिक नवीन व जुन्या बसथांबा येथील अतिक्रमण हटवावे, तसेच वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

------------------------------------------------------------

सायकलींना चारचाकीची धडक दोघे जखमी

अमरावती : दोन सायकलींना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने, या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रंगोली लॉन पुढे मंगळवारी घडली.

सायकलने पहाटेची रपेट करीत असलेले महेश शिवकुमार गुप्ता(४३, रा. विलासनगर) व त्यांचा मुलगा आर्यन यांना चारचाकी वाहनाने धडक दिली. एम एच २७ बी झेड ८८६४ क्रमांकाच्या या चारचाकीमुळे दोघेही जखमी झाले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध मंगळवारी कलम २७९,३३७ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------------------

मायानगर येथे महिलेला शिवीगाळ

अमरावती : मोबाइल टाॅवरला परवानगी देणारी स्वाक्षरी केल्याबद्दल एका महिलेला मायानगर येथे शिवीगाळ करण्यात आली, तसेच घातक शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी सोमवारी संतोष पावडे, अक्षय पावडे, हर्ष पावडे व एका महिलेविरुद्ध भादंवि कलम २९४, ३५२, ५०६ (ब) ३४, ब अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------------------

प्रेमविवाहानंतर विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

अमरावती : प्रेमविवाह करणाऱ्या पतीने लग्नानंतर माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला, तिला घराबाहेर काढण्यात आले. नागपूर शहरातील बुटीबोरी येथे हा प्रकार घडला.

विवाहितेच्या तक्रारीवरून दिनेश पटेल (रा. गरगरणे लेआउट नागपूर) याच्याविरुद्ध कर्वेनगर पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------------------

विदेशी मद्याची अवैध विक्री

अमरावती : मालवीय चौकातील एका सुवर्णकाराच्या दुकानाजवळ विदेशी मद्याची अवैध विक्री करीत असलेला आरोपी शेख शेख अजीज (५२, रा. लालखडी) याला दोन फेब्रुवारी रोजी शहर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्याच्याकडून पंधराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

--------------------------------------------------------------------

छाया कॉलनीत इसमाची आत्महत्या

अमरावती : मूळचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे रहिवासी असलेले नारायण रामदास गावंडे (५२, रा.कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छायानगर) यांनी येथील भाड्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नारायण गावंडे यांचा २६ वर्षीय मोठा मुलगा शुभम याचा पाच महिन्यांपूर्वी विजेच्या धक्याने मृत्यू झाला होता, तेव्हापासून ते विमनस स्थित होते. २ फेब्रुवारी रोजी त्यांनी सहा ते सातच्या सुमारास घरातील शौचालयात गळफास घेतला. सूरज नारायण गावंडे २३ यांच्या फिर्यादीवरून कोल्हापुरीगेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

------------------------------------------------------------------------

पालाश लाइन येथे युवकाची आत्महत्या

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलाश लाइन येथील योगेश अजय मराठे २८ या युवकाने घरी गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. आत्महत्येचे कारण पुढे आले नाही.