शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

परतवाड्यात आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: May 22, 2015 00:42 IST

दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी

सुनीश देशपांडे अचलपूरदुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते, वाहनांची वाढती संख्या, शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात नगरपालिका शुक्रवार २२ मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे. ही मोहीम तीन दिवस चालणार असून यामध्ये तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, नझूल अधिकारी सहभागी होणार आहेत. यामुळे रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे. येथील मुख्य रस्त्यापासून ते गल्लीबोळात दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मूळ रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यात बांधलेल्या खासगी कॉम्प्लेक्सला पार्किंग झोन नसल्याने लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन लहानमोठे अपघात होतात. अचलपूर नगरपालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पण पुन्हा तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता न घेतल्याने काही दिवसात ‘जैसे थे’ ची परिस्थिती निर्माण झाली. अनेकदा अतिक्रमण हटवू नये म्हणून नगरसेवकांचा दबाव येत असे, असे संबंधित अधिकारी सांगत असत. मागील १५ दिवसांपूर्वी आलेले अचलपूर नवनियुक्त प्रशिक्षणार्थी, उपविभागीय अधिकारी शनमुगम राजन यांच्या पुढाकाराने अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्यापूर्वी अतिक्रमितांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. तसेच नोटीसही देण्यात आली. अतिक्रमितांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण हटवावे, अन्यथा नगरपालिका बुलडोजरने ते अतिक्रमण काढतील. यात नुकसान झाल्यास अतिक्रमणधारक जबाबदार राहतील, अशाही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. काही अतिक्रमित दुकानदार रस्त्यापर्यंत आपला विक्रीचा माल ठेवत असल्याने लहानमोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यांचे प्रथम अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अचानक भेट देऊन कुणी दुकानाबाहेर माल आणून ठेवलेला असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.