कारवाई नाही : नगर पालिकेकडे सुरू आहे चार वर्षांपासून पाठपुरावा अचलपूर : प्रस्तावित समाज मंदिराच्या जागेवर नगरपरिषदेच्या काही कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी अतिक्रमण करुन घराचे बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी सदर भागातील रहिवासी चार वर्षांपासून नगरपालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र पालिका प्रशासन याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. परतवाडा येथील देशमुख प्लॉट शीट नंबर २० डी प्लॉट नं.१४४ या अधिन्यासात अ. भागात ४६ प्लॉट व ब भागात ६५ प्लॉट आहेत. १०० बाय ११५ चौरस फुटात हनुमान मंदिर आणि १०० बाय ८० चौरस फुटाच्या क्षेत्रात सभा मंडपाची जागा एकमेकाला लागून आहे. मंदिर व सभा मंडप हे धार्मिक स्थान असून सभा मंडपाच्या उपयोगाकरिता आहे. यामधील उर्वरित परिसरात लहान मुलांना खेळण्याकरिता बरीचशी खुली जागा आहे. काही लोकांना स्वत:च्या मालकीचे प्लॉट व त्यावरील बांधकामासहीत परस्पर खरेदी विक्री केली. नंतर बेकायदेशीरपणे बांधकाम करुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न दररोज सुरु आहे. अतिक्रमितांची कोणतीही मालकी नाही. त्यांच्याकडे नगर परिषदेच्या बांधकामाची परवानगी नाही. अतिक्रमितांना येथील रहिवाशांनी हटकले असता ते अश्लील शिवीगाळ करतात. सदर अतिक्रमण त्वरित काढून टाकण्यात यावे, यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे स्थानिक रहिवाशांनी सविस्तर लेखी निवेदन दिले आहेत. त्यावर उत्तम साखरे, विलास डोंगरे, पुरुषोत्तम डोंगरे, दीपचंद नंदेश्वर, सुनील कोचे, भैसारे, अनिल जांभुर्णे, राजेश साखरे, नीलेश नंदेश्वर, कुंदन जनबंधू, सत्यम इंदूरकर, राहुल शिंपी यांचेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)बांधकामाची एनओसी नाहीसुनील दादाराव साखरे यांनी नगर परिषदेकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर परशराम साखरे, ठाकूर, हिरामन इंदूरकर ह्या दोघांना नगर परिषद कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची बांधकामची एनओसी देण्यात आलेली नाही.पालकमंत्र्यांचे कारवाईचे आदेशपालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सदर प्रकरण तपासून त्वरित नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमित जागेवर बांधकाम करणाऱ्या संशयितांची नावे व त्यांना बांधकाम करण्याची परवानगी आहे का याची माहिती आम्ही नगर परिषदेकडून घेतली आहे. त्यांच्या नावे लेखी तक्रार दिल्यावरही नगरपरिषदेने अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ केली असून अतिक्रमणधारकांत पालिकेच्याही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. - उत्तम साखरे,सामाजिक कार्यकर्ते.मी सध्या मुंबईला जात असून प्रवासात आहे. बिडच्या न्यायालयात ९ तारखेला साक्षपुरावा आहे. त्यानंतर अचलपूर येथे येइल व या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेइल. सदर जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केलेली असल्यास किंवा ताब्यात असल्यास अतिक्रमित बांधकाम अवश्य हटवणार.- धनंजय जावळीकर,मुख्याधिकारी.
समाजमंदिराच्या जागेवर अतिक्रमण
By admin | Updated: July 6, 2015 00:12 IST