शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या भूखंडावर ‘हरिकिसन मालू’ स्कूलचे अतिक्रमण

By admin | Updated: May 28, 2017 00:11 IST

शेगाव-रहाटगाव रस्त्यावरील देशमुख लॉन मंगल कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी नगरमधील ६१० वर्ग मीटर मोकळ्या जागेवर हरिकिसन मालू स्कुलच्या संचालकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.

रहिवाशांचे निवेदन : आयुक्तांकडे धाव, चौकशीचे निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेगाव-रहाटगाव रस्त्यावरील देशमुख लॉन मंगल कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी नगरमधील ६१० वर्ग मीटर मोकळ्या जागेवर हरिकिसन मालू स्कुलच्या संचालकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. हे अतिक्रमण विनाविलंब हटवावे, अशी आर्जव स्थानिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश एडीटीपींना दिले आहे.ज्ञानेश्वरीनगरमधील भाऊराव पानसे, प्रभाकर वाटाणे, दीपक सोळके, शाम सोळंकी, मंगेश गाढवे, विजय वानखडे, किशोर घुलक्षे, उल्हास बारब्दे, गणेश चव्हाण, श्रीकांत वऱ्हेकर, देशमुख, जोशी, दिलीप पन्नासे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. २२ मे रोजी या स्थानिकांनी महापालिका आयुक्तांच्या नावे अतिक्रमणाबाबत तक्रार नोंदविली असून यापूर्वी १५ मे रोजीही त्यांनी निवेदन दिले होते.ज्ञानेश्वरीनगर परिसरातील ६१० वर्गमीटर जागा मोकळी तथा खुली ठेवण्यात आली आहे. ती स्थानिक रहिवाशांच्या वापराकरिता राखीव आहे. मात्र या जागेवर ‘हरिकिसन मालू स्कुल’च्या संचालकांनी तार कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. तर १५ मेपासून ‘व्यायामशाळा’ या नावाखाली पक्क्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ६१० वर्गमीटर या जागेचे मधोमध बांधकाम सुरू केले असल्याने आता तेथील चारही बाजूने असलेली मोकळी जागा इतर कोणत्याही उपयोगात येत नाही. त्यामुळे संस्था संचालकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.अहवाल मागितलाया संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करावी व अहवाल द्यावा, असे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांना दिले आहेत. २२ मे रोजी दिलेल्या या निर्देशानंतर कांबळे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.