२५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले, त्यानंतर नवीन ठिकाणी बांधकाम झाले. अन्य ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. सदर क्वार्टरमध्ये याच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी राहत होते. मात्र, दहा वर्षांपासून क्वार्टर बंद असल्यामुळे गावात राहावयास आलेल्या बाहेरील व्यक्तीला या भागातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने व ग्रामपंचायत सदस्यांनी संगनमत करून ते सरकारी क्वार्टर राहावयास दिले. पाच वर्षांपासून तेथे अनधिकृतपणे कब्जा करून ती व्यक्ती राहत आहे तसेच कृषी विभागाच्यावतीने पुन्हा दोन क्वार्टर येथे बांधण्यात आले होते, त्यावरसुद्धा बाहेर ठिकाणावरून राहावयास आलेल्या दोन कुटुंबांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतले. कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करून ती मालमत्ता ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अंजनसिंगी येथील सरकारी क्वार्टरवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST