शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

शासकीय जमिनींवर अतिक्रमण

By admin | Updated: August 29, 2016 00:04 IST

जिल्ह्यातील ब्रिटिशकाळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे.

३७ हजार हेक्टर जमीन : सार्वजनिक जागा, गायरान ग्रामस्थांच्या मालकीचे !मोहन राऊत धामणगाव रेल्वेजिल्ह्यातील ब्रिटिशकाळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या शासकीय जागेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील ३७ हजार हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे़ गावात सार्वजनिक ठिकाणे असलेली जागा व गायरान ग्रामस्थांच्या मालकीचे बनले आहेतब्रिटिशकाळापासून प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते. तसेच स्मशानभूमी, सार्वजनिक मंदिरे, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामाकरिता ग्रामपंचायतीमध्ये या जागेची नोंद असते या जागेचे संरक्षण करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना या सार्वजनिक जागेवर गावात अतिक्रमण करून ग्रामपंचायतीच्या आठ 'अ' ला नोंदणी करण्याचे प्रकार वाढले आहेत़ विशेषत: अशा जागांवर अनधिकृत बांधकाम करून ही जागा अनेक गावांतील पुढाऱ्यांनी आपल्या नावाने केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ गावातील जनावरे चारण्यासाठी प्रत्येक गावाच्या परिसरात गायरान म्हणून जागा अनेक वर्षांपासून आरक्षीत असताना ही जागा तलाठ्यांना हातात घेऊन स्वत:च्या नावाने जागा मालकीची करण्यात आली आहे़ भोगवट वर्ग २ ची असलेली जागा काहींनी महसूल प्रशासनाच्या हातात हिरव्या नोटांचा गठ्ठा देऊन भोगवट वर्ग १ करून अशा जमिनींची नोंद करवून या जमिनीची विक्री करण्याचे व्यवहार जिल्ह्यात युद्धस्तरावर सुरू आहे़ मृत व्यक्तींच्या जमिनीही दलालांच्या घशातगावातील अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला व त्या व्यक्तीला वारस नसेल तर अशा जमिनीवर दलालांनी ताबा घेतला आहे़ जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खोट्या खरेदी खत करून या जमिनी दलालांनी मागील पाच वर्षात बळकावल्या आहे़ गावातील तलाठ्यांनी कोणताही जाहिरनामा काढण्याऐवजी तथा या जमिनी सरकारजमा न करता अशा शेतजमिनीच्या सातबारावर दलालाचे नाव चढविले आहे.देवस्थांनाच्या जमिनींचा गैरवापरप्रत्येक गावातील देवस्थांनाच्या देखभालीसाठी खर्चाची तजवीज करण्याकरीता जमिनी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ या उत्पन्नातून संबधीत देवस्थांनाचा खर्च करण्यात यावा, हा या मागचा उद्देश असताना देवस्थांनाच्या जमिनीची ९९ वर्षाच्या कराराने परस्पर विक्री करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ४७ देवस्थानाच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती आहे़ शाळांच्या जमिनीवर अतिक्रमण प्रत्येक गावात जिल्हापरिषदेंतर्गत शाळांच्या जमिनी आहेत़ दरवर्षी या जमिनींता वर्षभराकरिता पिके काढण्यासाठी लिलाव केला जातो. शिक्षण विभागाला यातून रक्कम मिळत असली तरी अशा जमिनीवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहेत़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा या तीन तालुक्यातील शाळांच्या जमिनी ग्रामस्थांच्या ताब्यात गेल्या आहेत़ महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़