शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारक, हातगाडीचालक, अव्यवस्थित वाहतूक ‘लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

पान ३ वर मस्ट फोटो पी ३० आरती सिंह अमरावती : पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी शहरातील वाहतूक ...

पान ३ वर मस्ट

फोटो पी ३० आरती सिंह

अमरावती : पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्तद्वय शशीकांत सातव व विक्रम साळी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस निरीक्षक रमेश टाले, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार व प्रवीण काळे, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.

शहरात फळविक्रेते व भाजीविक्रेते हातगाड्यांची संख्या वाढली असून, नियमितपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. शहरातील ब्लॅक स्पाॅटवर अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण स्थळांचे सूचना फलक लावणे, चित्रा चाैक ते नागपुरी गेट रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने ते खड्डे बुजविणे, शहरातील सिमेंट रस्त्यालगत पेव्हरचे काम जलदगतीने पूर्ण करणे, उड्डाणपुलाखाली तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या नियोजित पार्किंग स्थळी चारचाकी व दुचाकींसाठी फलक लावणे, शहरातील मुख्य चाैकात झेब्रा क्राॅसिंग आखणे तसेच पिवळे पट्टे मारणे तसेचट अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

अशा सुचविल्या सुधारणा

शहरातील रस्ते बांधकाम खूप संथगतीने होत असल्याचे निर्दशनास आल्याने सदरचे काम जलद गतीने करणे, जवाहर गेट ते प्रभात चाैक व दीपक चाैक ते जयस्तंभ चाैक येथे वन-वेचे बोर्ड लावणे शहराकरिता मंजूर असलेले सीसीटीव्ही प्रोजेक्ट कार्यवाही जलद गतीने करणे, लाॅकडाऊन दरम्यान वेळेचे पालन करीत नसलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई पथकांच्या संख्येत वाढ करणे व पोलस प्रशासनासह संयुक्त कारवाई करणे, पोलीस कर्मचारी निवास्थानाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करण्याची सूचना करण्यात आली.

तक्रार निवारण समिती

रस्ता दुभाजक व स्पीड ब्रेकर यासंबंधाने प्राप्त तक्रारीचे निवारण करण्याकरिता कमिटी स्थापन करून त्यात मनपा, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, विद्युत महामंडळ, जीवन प्राधिकरण विभागातील सदस्यांद्वारे निर्णय घेऊन समस्यांचे निराकरण करणे, वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका सीमा क्षेत्र प्रारंभ अशा प्रकारचे बोर्ड लावणे, रस्त्यांवर जेथे वाहनांना वेगमर्यादा आणलेली आहे तेथे तसे बोर्ड दर्शनीय भागात लावणे आदी सूचनांचा यात समावेश आहे.