आरोग्य धोक्यात : अद्यापही तक्रारीची दखल नाहीवरुड : स्थानिक मुलताई मार्गावरील १३२ के.व्ही. पॉवर हाउसच्या दर्शनी भागात रस्त्याच्या कडेला घाण पाण्याचे डबके साचले आहे. डासांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आजाराला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. याबबात नागरिकांनी तक्रारी करुनही दखल घेण्यात आली नाही. पॉवर हाऊसचा विद्युत खांबसुध्दा यामध्ये असल्याने विद्युत शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.स्थानिक वरुड मुलताई राज्य महामार्गालगतच्या १३२ के.व्ही. पॉवर हाऊसच्या कुंपण भिंतीलगत मोठा खड्डा आहे. येथून सांडपाणी बाहेर जाण्यास मार्ग नाही. यामुळे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे मलेरिया, टाईफाईडचे आजार होण्याची शक्यता लक्षात घेता विज वितरण कंपनीव नागरिकांनी नगरपरिषदेकडे ेलेखी तक्रार दिली. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. खराब पाण्याच्या साचलेल्या डबक्यामध्ये १३२ के.व्हि हायटेंशन लाईनसुध्दा यावरुनच गेली आहे. सदर लाईनचे खांब डब्क्यावरून जात असल्याने तार तुटून खड्यात पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डासांची प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने साचलेल्या या डबक्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पॉवर हाउसजवळ घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: July 21, 2015 00:22 IST