शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:03 IST

राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे,

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे : विभागीय बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटनअमरावती : राज्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी ग्रामविकास विभागाचे व शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी बचत गटांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्यांना बँकांकडून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकास, रोजगारहमी योजनामंत्री पंकजा मुंडे यांनी केले.ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना प्रचार व प्रसिद्धीअंतर्गत सायन्सस्कोर मैदानावर १० ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित विभागीय महिला मेळावा तसेच बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंच्या ‘विकास गंगोत्री’ या विभागीय स्तरावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून खा.अडसूळ, आमदार भिलावेकर, बच्चू कडू, अनिल बोंडे, यशोमती ठाकूर, रमेश बुंदिले, महापौर नंदा, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, यवतमाळ जि.प.च्या अध्यक्ष आरती फुफाटे, बुलडाण्याच्या अलका खंडारे, वाशिमच्या सोनाली जोगदंड, अकोल्याचे शरद गवई तसेच निवेदिता चौधरी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, विभागीय आयुक्त राजुरकर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, उपायुक्त आर.यू.अवचार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जि.प. उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती वृषाली विघे, लीना बनसोड आदींची उपस्थिती होती.चूल आणि मूल शाप नसून वरदानच !चूल आणि मूल हे महिलांसाठी शाप नसून वरदानच आहे. कारण चूल आणि मूल सांभाळणे हे फार मोठे जबाबदारीचे काम आहे. त्यात कमीपणा नसावा, आपले पाल्य संस्कारक्षम निर्माण व्हावेत यासाठी ही जबाबदारी आवश्यक आहे, असे सांगून ना.मुंडे म्हणाल्या, समाजातील माता, स्त्री सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांना नतमस्तक होऊन जबाबदारीच्या कामाचा श्रीगणेशा झाला पाहिजे. स्त्री समाजाचे पालन पोषण, सुसंस्कारित समाज निर्मिती करते, यासाठी त्यांच्या हाताला ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यांना निर्णय घेण्याची शक्ती द्या, त्याचा ते निश्चितच सदुपयोग करतील, असे ना.मुंडे म्हणाल्या.