शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:20 IST

आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाचशे तरूण-तरूणींना रोजगाराची संधी मिळाली असून परप्रांतातील नामांकित संस्थांमध्ये आदिवासी युवकांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

- गणेश वासनिक। 

अमरावती, दि.9 - आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाचशे तरूण-तरूणींना रोजगाराची संधी मिळाली असून परप्रांतातील नामांकित संस्थांमध्ये आदिवासी युवकांनी वेगळा ठसा उमटवला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण हे प्रमुख उद्देश असले तरी ‘व्हिलेज इको टुरिझम’ अंतर्गत आदिवासींना रोजगार मिळवून देणे हेदेखील त्यांचे उत्तरदायित्व आहे. त्याअनुषंगाने व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांनी जनविकास योजनेंतर्गत १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आदिवासी युवक-युवतींसाठी ‘प्रथम’ नामक संस्थेच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण सुरू केले आहे. जुलै ते सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५० आदिवासी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. एका उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प १६ हजार रूपये खर्च करीत आहे.  त्याअनुषंगाने मेळघाटातून दर महिन्याला ३५ आदिवासी युवक- युवतींची चमू प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे पाचशे आदिवासी युवक-युवती आणि महिलांना रोजगार मिळाला आहे. राजकोट, लोणावळा, शिर्डी, पुणे, महाबळेश्वर, मुंबई, बडोदा आदी मोठ्या शहरातील हॉटेल, रिसोर्टमध्ये आदिवासी युवक नोकरीवर आहेत. हॉटेल मॅनेजमेंट ईलेक्ट्रिशियन, वातानुकुलित यंत्र दुरूस्ती, शिवणकाम, तीन महिन्यांचे वेल्डिंग प्रशिक्षण तर आॅटोमोबाईलचे ७५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा खर्च ते रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्पाने घेतली आहे. प्रशिक्षणाअंती रोजगारासाठी पाठविलेल्या आदिवासी युवक, युवतींबाबतची माहिती घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. आॅगस्ट महिन्यात नवी बॅच प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आली.

आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगारमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या ११८ गावांमधील आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट येथील सी.के.लाख युनिटसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांना लाखेच्या बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बांगड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य सदर एजन्सी पुरवीत असून बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारीदेखील याच एजन्सीकडे आहे. आतापर्यंत २२९ आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून दरदिवसाला १५० ते २०० बांगड्या निर्मितीतून आदिवासी महिला मिळवीत आहेत. 

मेळघाटात ज्या गावांमध्ये ‘व्हिलेज ईको टुरिझम कमिटी’अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत पाचशे जणांना रोजगार मिळाला असून लवकरच पोल्ट्री फार्म युनिटची संकल्पना आहे. नागपूर विद्यापीठासोबत तसा करार केला जाणार आहे.- एम.एस.रेड्डी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प