शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारीच निघाले धान्यचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:09 IST

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले रोजंदारी कर्मचारीच अडत्या, व्यापाºयांचे धान्य चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसीसीटीव्हीमध्ये कैद : पोलिसात तक्रार, घटनांचा होणार उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले रोजंदारी कर्मचारीच अडत्या, व्यापाºयांचे धान्य चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली. याची तक्रार शनिवारी पोलिसात केल्याने आतापर्यंतच्या चोरीच्या घटनांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील काळे आणि वाटाणे ट्रेडींग कंपनी आहे.मध्यरात्री नेले पोतेयामधून १३ आॅगस्ट रोजी तुरीचे ५० किलोचे पोते (कट्टा) रात्री एक वाजता चोरून नेत असताना बाजार समितीचा रोजंदारी कर्मचारी रोशन गुरमाळे सीसीटीव्हीत कैद झाला. त्याच्यासोबत आणखी दोघे एका पांढºया रंगाच्या इंडीकामध्ये आल्याचे स्पष्ट दिसत आहे. रोशन गुरमाळे हा बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षांपासून रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. काळे आणि वाटाने यांच्या ट्रेडींग कंपनीमध्ये गजानन वाटाने या शेतकºयाने तूर विक्रीसाठी आणली होती. मात्र दुसºया दिवशी प्लास्टीक पोत्यामधील ५० किलोचे एक कट्टे चोरीला गेले होते.अनेक चोºया, पोलिसात तक्रारअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या. शेतकरी, व्यापारी व अडत्यांच्या धान्याची रात्री चोरी केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. याच कर्मचाºयाने एका संचालकाविरूद्ध घरगुती कामे करण्यासाठी दबाव आणीत असल्याची तक्रार दिली होती. बाजार समितीमध्ये आरोपींनी किती धान्य चोरले हे उघड होईल. विशेष म्हणजे यात मोठे रॅके ट असण्याची शक्यता आहे.काळे आणि वाटाणे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरात तूर पोते चोरताना रोजंदारी कर्मचारी असल्याची तक्रार मिळाली. त्यावरून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.- मंगेश भेटाळू, सचिव, कृउबा समिती, अचलपूर