शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

संपकाळात कर्तव्यावरील कर्मचाऱ्याचे कापले केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:08 IST

संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्यांचा अहेर दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक : महिला पदाधिकाऱ्यांनी दिला बांगड्याचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्यांचा अहेर दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.संप कालावधीत कार्यालयात एका शासकीय संस्थेत कर्मचारी काम करीत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यास मिळताच त्या संघटनच्या पदाधिकाऱ्यांसह नामदेव गडलिंग यांनी त्या कर्मचाऱ्याचे केस कापले. त्याचेसोबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एच.बी.घोम, सरचिटणीस डी.एस.पवार, एस.डी.कपाळे, एस.ड़ब्ल्यू. शिर्के, श्रीकृष्ण तायडे, वर्षा पागोटे, अशोक हजारे होते. यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष कांताताई बितरे यांनी बांगड्याचा अहेर त्या कर्मचाऱ्याला केला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जोशी, सचिव महेंद्र हरताळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा तीन दिवसीय संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्र्यालयात शुकशुकाट होता. प्रत्येक विभागातील संबधीत कर्मचाऱ्यांद्वारा कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आल्याने शासकीय सेवा प्रभावित झाल्याचे दिसून आले. या संपामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कर्मचारी दुसऱ्या दिवशी संपात सहभागी नव्हते. मात्र, शिक्षक व ग्रामसेवक संघटना संपात सहभागी होत्या.दुसऱ्या दिवशीही संपाची दाहकता कायमचांदूरबाजार : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा शासकीय कामकाजाला तालुक्यात चांगलाच दणका बसला आहे. मंगळवारी सुरू झालेल्या संपात काही कर्मचारी सहभागी होऊ शकले नव्हते. त्यापैकी अनेक जण दुसºया दिवशीही संपात सहभागी झाले.दर्यापुरात पं.स., महसूल संघटनेचा संपात सहभागदर्यापूर : वेतन आयोगाच्या आश्वासनानुसार तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती कर्मचारी व महसूल संघटनेने तहसीलदार अमोल कुंभार यांना निवेदन दिले. आवाहनानुसार मंगळवारी सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला.सेतू केंद्रातील कामे खोळंबलीजिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रा आदींसाठी विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास झाला. कार्यालयात अधिकारी उपस्थित होते. मात्र, प्रकरणाचे प्रस्ताव करणारे कर्मचारीच संपावर असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. अधिकाऱ्यांनी फायली स्वत: तपासून स्वाक्षरी केल्याने मागील आठवड्यातील प्रकरणांची प्रमाणपत्रेच मिळू शकली.