शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन पीक नियोजनच तारणार

By admin | Updated: July 14, 2017 00:38 IST

यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये

सरासरीच्या ५० टक्केच पाऊस : दीड लाख हेक्टरमध्ये पिकांना मोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांना मोड येऊन दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या जिल्हानिहाय पीक आराखडा ‘आयसीएआर’ या संस्थेने ‘सीआरआयडीए’ (सेंटर रिसर्च इंस्टिट्यूट फॉर ड्रायलँड अ‍ॅग्रीकल्चर) यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. कृषी विद्यापीठानेदेखील आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी केलेल्या आहेत. पाऊस वेळेवर सुरू न होने, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे आदी हवामानाच्या अनिश्चितीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीमध्ये शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यापासून मिळणारा पाऊस हा विदर्भात ढोबळमानाने एकाचवेळी पडतो. मात्र कमी दाबाचा पट्टा जेव्हा विदर्भात नसतो तेव्हा विदर्भातील पावसाच्या प्रमाणात तालुका व जिल्ह्यात मोठे बदल आढळून येतात. नियमितपणे पावसाळा सुरू होतो तेव्हा तीन दिवसांत विदर्भ व्यापतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून (२४ वा हवामान आठवडा) दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. पावसाळा जर एक, दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास ही आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरल्या जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्येमध्ये बदल करावा लागतो. यासाठीच आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे आहे.पावसाळा दोन ते तीन आठवडे ऊशीरा सुरू झाल्यासपावसाळा दोन ते आठवडे ( २ ते १५ जुलै) उशीरा सुरू झाल्यास अमेरीकन तसेच देशी कपासीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत.साधारणपणे २० टक्के बियाणे जास्त वापरावेत.सुधारित व संकरित वाणांच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी ठेवावे.मूग, सोयाबीन, उडीद पिकांचा आंतरपीक म्हणून वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर ही आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रात कापूस : ज्वारी : तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, बियाणे जास्त वापरावेत. पावसाळा १६ ते २२ जुलै म्हणजेच चवथ्या आठवड्यात सुरु झाल्यास २५ टक्के बियाणे अधिक वापरावेत, तर खतांचा २५ टक्के कमी वापर करावा मूग, उडीदाची क्षेत्र कमी करावे किंवा टाळावे.