शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अमरावतीत आदिवासी विभागात बोगस संस्थेद्वारे १ कोटी ९५ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:23 IST

Amravati News tribal division आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्पांमध्ये अस्तित्वातच नसलेल्या संस्था दर्शवून १ कोटी ९५ लाख ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला आहे.

ठळक मुद्देचौकशी समितीचा अंतरिम अहवाल कौशल्य विकास प्रशिक्षण कागदोपत्रीचसंस्थाचालकांवर फौजदारीसाठी टाळाटाळ

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्पांमध्ये अस्तित्वातच नसलेल्या संस्था दर्शवून १ कोटी ९५ लाख ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला आहे. ही बाब चौकशी समितीच्या अंतरिम अहवालात स्पष्ट झाली आहे. ‘ट्रायबल’ आयुक्तांनी याप्रकरणी संबंधित बोगस संस्थाचालकांवर फौजदारी दाखल करून कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून फौजदारी दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना धारणी, पांढरकवडा, कळमनुरी, अकोला, किनवट, औरंगाबाद व पुसद या प्रकल्पांमध्ये परभणी येथील जाणताराजा चॅरिटेबल संस्था, क्रांती ज्योती प्रमिलाबाई चव्हाण महिला मंडळ व औरंगाबाद येथील श्रीमंत महाराज माधवराज सिधींयाजी फाऊंडेशन सिद्धीविनायक रेसिडेन्सी, नाथपुरम पैठण रोड औरंगाबाद या तीन संस्थांना वॉर्ड बॉय प्रशिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पीटल मॅनेजमेंट प्रशिक्षण, रिटेल मार्केटिंग, इलेक्ट्रिक फि टींग हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविली होती. संस्थाध्यक्ष रमेश जाधव, सचिव शैलेश अंबोरे यांनी प्रशिक्षण देण्यासंदर्भात ‘ट्रायबल’शी करारनामा केला होता. परंतु, आदिवासी लाभार्थ्यांना प्रशिक्षण न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस देयके काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सन २०१२ ते २०१६ यादरम्यान न्युक्लीअर बजेट अंतर्गत प्रशिक्षण झालेच नाही, तरीही देयके कशी देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे.आयुक्तांनी अपहार झाल्याप्रकरणी फौजदारी दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. बोगस संस्थाचालकांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार फौजदारी दाखल करणे अपेक्षित आहे. याप्रकरणी चौकशी समितीचा अंतरिम अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती.

टॅग्स :fraudधोकेबाजी