विदारक वास्तव : २ हजार ८७३ वयोवृद्ध श्रमिकांची नोंदणीजितेंद्र दखने - अमरावतीपोटाची खळगी भरण्यासाठी एक दोन नव्हे, तर चक्क २ हजार ८७३ इतके ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये राबत आहेत. एकीकडे शासकीय नोकरीत अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ ते ६० इतकी असताना रोजगार हमी योजनेत राबणारे सुरकुुतलेले आणि थरथरणारे हात पाहिले की अंगावर शहारे येतात. प्रशासनाने जिल्ह्याच्या संकेतस्थळावर टाकलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात सुमारे २ हजार ८७३ ज्येष्ठ नागरिकांनी रोहयोच्या कामांसाठी नोंदणी केली असून २०१४-१५ या आर्थिक वर्षात प्रशासनाने या सर्व ज्येष्ठांना काम पुरविल्याचे आकेडवारीवरून दिसून येते. विविध कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी २५० ते ३०० रूपये मजुरी मिळते. रोजगार हमी योजनेच्या कामावर मात्र दिवसभरात अडीचशे रूपयेदेखील हाती पडत नाहीत. यामुळे तरूण वर्ग रोजगार हमी योजनेपासून दूर जात आहे. रोहयोच्या कामांकडे तरूणांचा ओढा नसल्याने आपसुकच वयोवृद्धांची संख्या वाढत चालली आहे.
रोजगार हमी योजनेवर राबू लागले थरथरते हात!
By admin | Updated: July 20, 2014 23:56 IST