शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आरटीईत पात्र; शाळेचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:07 IST

यंदाच्या सत्रासाठी इयत्ता पहिलीत आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका विद्यार्थिनीचा आरटीई प्रवेश कोट्यातून नंबर लागला. परंतु, त्या विद्यार्थिनीचे पालक प्रवेश करण्यासाठी शुक्रवारी सदर शाळेत गेले असता, नमूद पत्त्यावर ती शाळाच अस्तिवात नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली.

ठळक मुद्देतांत्रिक घोडचूक : विद्यार्थिनीचा हिरमोड, पालकांची फरफट; गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सचिन मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : यंदाच्या सत्रासाठी इयत्ता पहिलीत आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका विद्यार्थिनीचा आरटीई प्रवेश कोट्यातून नंबर लागला. परंतु, त्या विद्यार्थिनीचे पालक प्रवेश करण्यासाठी शुक्रवारी सदर शाळेत गेले असता, नमूद पत्त्यावर ती शाळाच अस्तिवात नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून प्रभारी गटशिक्षणाधिकाºयांकडे लेखी तक्रार सादर केली.आशा-मनीषा मंदिर परिसरातील रहिवासी प्रतीक्षा रवींद्र सोळंके हिच्या २५ टक्के शाळा प्रवेशाच्या आॅनलाइन अर्जात पहिल्या क्रमाकांवर गांधीनगर येथील दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलला पालकांनी पसंती दिली होती. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये आपणास २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया २०१८ अंतर्गत सादर केलेल्या माहितीच्या आधारे येथील दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळेचा क्रमांक कोड २७०७०८१०९१७ असा आहे. या ठिकाणी प्रवेश मिळाल्याची आॅनलाइन सूचना सदर विद्यार्थिनीच्या पालकांना प्राप्त झाली. त्यांचा अर्ज क्रमांक १८ एएम ००१२४० असा असून, आरक्षणामध्ये एसटी अशी नोंद आहे. विद्यार्थिनीचे वडील रवींद्र सोळंके हे प्रतीक्षासह अन्य नातेवाइकांसोबत गांधीनगर येथे गेले असता, तेथे दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूलचा पत्ताच नव्हता.ही बाब त्यांच्यासाठी धक्कादायक होती. यासंदर्भाची लेखी तक्रार शुक्रवारी सकाळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश घाटे यांच्याकडे पालकाने सादर केली होती, तेव्हा दर्यापूर इंग्लिश मीडियम स्कूल ही तालुक्यातील सासन येथे स्थानांतरित करण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. एवढ्या लांब प्रवेश घेणे शक्य नसल्याची खंत रवींद्र सोळंके यांनी व्यक्त केली असून, मुलीच्या भविष्याची चिंता शिक्षण विभागानेच दूर करावी, असे आवाहन केले आहे.दर्यापूर इंग्लिश मिडियम स्कूल सासनला स्थानांतरित झाली आहे. पत्ता दुरुस्त करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली नसल्याने यादीत नाव कायम राहिले. प्रतीक्षाला नजीकच्या साईनगर येथील शाळेत प्रवेश घेता येईल, असे तिच्या पालकांना कळविले आहे.- प्रकाश घाटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, दर्यापूर