शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

अमरावती येथे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मूक मोर्चा निघाला. भारत मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती पार्टी, जमियत उलेमा-ए-हिंद, भीम आर्मी, महामानव संघटना, बारा बलुतेदार संघटना, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, ओबीसी महासभा, आप, टिपू सुल्तान ब्रिगेड, टिपू सुल्तान सेना, एमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लिग, युथ मुस्लिम लिग, पहल फाऊंडेशन (बडनेरा), विदर्भ उर्दू साहित्य समिती आदी ३६ संघटनांचा यात सहभाग होता.

ठळक मुद्देविविध संघटनांचा सहभाग : अमरावती, अचलपूर, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी शहरांमध्ये मूक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटलेत. ‘हम भारत के लोग’ असे म्हणत त्यांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचलपूर, परतवाडा, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी येथेही तहसील व उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून विरोध करण्यात आला. या मोर्चात मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती.अमरावती येथे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मूक मोर्चा निघाला. भारत मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती पार्टी, जमियत उलेमा-ए-हिंद, भीम आर्मी, महामानव संघटना, बारा बलुतेदार संघटना, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, ओबीसी महासभा, आप, टिपू सुल्तान ब्रिगेड, टिपू सुल्तान सेना, एमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लिग, युथ मुस्लिम लिग, पहल फाऊंडेशन (बडनेरा), विदर्भ उर्दू साहित्य समिती आदी ३६ संघटनांचा यात सहभाग होता. मोर्चेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा फलकांद्वारे आपल्या समस्येकडे लक्ष वेधले. हा मूक मोर्चा जिल्हा कचेरीवर पोलिसांनी अडविला. यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना मागणीचे निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मोर्चातील प्रमुख वक्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सदर अन्यायकारक विधेयक रद्द करण्याची मागणी केली. बडनेरा शहरातही नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध करण्यात आला. पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सीएबी/सीएएस २०१९ विधेयक रद्द करण्याची मागणी केली.हातात राष्ट्रध्वज अन् फलकनागरिकत्व संशोधन विधयेकाविरोधात १९ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकºयांच्या हाती राष्ट्रध्वज आणि मागणीचे फलक झळकत होते. ‘हम भारत के लोग’, ‘भारत हमारी जन्मभूमी है’ असे लक्षवेधी फलक नागरिकांचे लक्ष वेधणारे ठरले.पोलिसांचा तगडा बंदोबस्तनागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात तीव्र विरोध दर्शविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता इर्र्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हे स्वत: या मोर्चावर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :NCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र