शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत चार मातामृत्यू, २०० बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:13 IST

यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.

ठळक मुद्देडफरीनच्या आरोग्य सेवेत सुधारणा : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचे प्रमाण कमी

वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. डफरीन रुग्णालयातील आरोग्यसेवेत सुधारणांचा हा प्रभाव आहे.जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना योग्य आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शहरात शासकीय रुग्णालये आहेत. ती कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असायचे. अनेकदा डॉक्टर व परिचारिकांवर हलगर्जीचे आरोप लागत होते. २०१७ मध्ये तुरळक घटनांवरून डॉक्टरांवर आरोप करण्यात आल्याचे आढळून आले आहे. एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा स्त्री रुग्णालयात १८ हजार ३७ महिला विविध उपचारासाठी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी ७ हजार ३८१ महिला प्रसूत झाल्यात. त्यांनी गोंडस बाळांना जन्म दिला. यामध्ये ४ हजार ३६२ महिलांची सामान्य प्रसूती झाली, तर २ हजार ६०६ महिलांचे सिझेरियन झाले. डफरीनमधील सुविधाजनक वातावरण व आरोग्य सेवेसंदर्भात पुरविल्या गेलेल्या सुविधांमुळे यंदाचे माता व बालमृत्यूचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षांची आकडेवारी२०१३-१४ मध्ये ९ हजार ९३८ महिला प्रसूत झाल्या. १३ मातामृत्यू व ५०७ बालमृत्यू झाले. २०१४-२०१५ मध्ये १० हजार ७२२४ महिला प्रसूत झाल्या. ७ मातामृत्यू व ३१८ बालमृत्यू झाले. २०१५-१६ मध्ये ११ हजार ८५ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १३२ बालमृत्यू झालेत. २०१६-२०१७ मध्ये १० हजार ४९२ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १९८ बालमृत्यू झाले.दररोज अडीचशे रुग्णांचा ओघडफरीन रुग्णालयात सहा वॉर्ड व २०० खाटांची व्यवस्था आहे. मात्र, दररोज अडीचशे रुग्णांचा येतात. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यात डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होते. अनेकदा एकाच बेडवर दोन रुग्णांवरसुद्धा उपचार करावे लागते.