आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील कामकाजाचा सोमवारी पहिलाच दिवस होता. लिफ्ट अडकल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. क्षमतेपेक्षा अधिक जण लिफ्टमध्ये बसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय नवीन इमारतीत कोणता कक्ष कुठे आहे, हे पाहण्यासाठी अनेकांना घिरट्या घालाव्या लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले.जिल्हा न्यायालयाची सर्व सुविधा व अत्याधुनिक यंत्रणेनेने सज्ज अशी पाच मंजली इमारत बनविण्यात आली. या इमारतीचे थाटात उद्घाटन झाले. मात्र, काही वकिलांनी बसण्याच्या मुद्द्यावरून नवीन इमारतीत जाण्यास विरोध दर्शविला. सोमवारी नवीन इमारतीत कामकाज करण्याचा पहिला दिवस होता. सकाळी न्यायाधीश, वकील, पक्षकार, कर्मचाऱ्यांचे न्यायालयाच्या नवीन इमारतीत आगमन झाले. सर्व जण आपआपल्या कक्षातील स्थानापन्न झाले आणि कामकाजात व्यस्त झाले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करण्यास सुरुवात केली. दरम्यान न्यायालयाच्या इमारतीची लिफ्ट बंद पडून काही जण अडकल्याने गोंधळ उडाला. लिफ्टमध्ये सात ते आठ जण बसल्यामुळे ती एका जागी अडकली. लिफ्टमध्ये काही जण अडकल्याच्या माहितीवरून तत्काळ संबंधित लिफ्टच्या केअर टेकरला फोनद्वारे सूचना देऊन बोलविण्यात आले. त्तपूर्वी या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक दाखल झाले. संबंधित कंपनीच्या लिफ्टचे केअर टेकर यांनी लिफ्ट सुरू करण्याचे प्रयत्न चालविले. दरम्यान घटनेच्या माहितीवरून न्यायालयीन परिसरात रुग्णवाहिका दाखल झाली होती. तब्बल अर्धातासानंतर लिफ्ट पूर्वरत सुरू झाल्यानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात लिफ्टविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बॉक्सअनेकांची तारांबळन्यायालयाच्या नवीन इमारतीविषयी माहिती असणाºयांना कामकाजाचा पहिला दिवस चांगला वाटला. मात्र, ज्यांना नवीन इमारतीतील न्यायाधीश व वकिलांच्या कक्षांची माहिती नव्हती, त्यांची तारांबळ उडाली. इमारतीत शिरणारे बहुतांश नागरिक सर्वप्रथम प्रवेशद्वारावरील पोलिसांजवळ चौकशी करीत होते. अनेकजण इमारतीच्या आतील भागात न्यायाधीश व वकिलांच्या कक्षाविषयी माहिती घेताना दिसले. पहिल्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाणे आणि पुन्हा खालच्या मजल्यावर फिरताना आढळून येत होते.
न्यायालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट अडकल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:26 IST
जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील कामकाजाचा सोमवारी पहिलाच दिवस होता. लिफ्ट अडकल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. क्षमतेपेक्षा अधिक जण लिफ्टमध्ये बसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट अडकल्याने गोंधळ
ठळक मुद्देक्षमतेपेक्षा अधिक वजनाने घडला प्रकार : पहिल्या दिवशीच अनेकांची गैरसोय