शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सिंभोरा पंपाची वीज खंडित, पाणी पुरवठाही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने ...

ठळक मुद्देपर्यायी सुविधाच नाही : अमरावतीकर नियमित पाण्याच्या प्रतिक्षेत, दिवसाआड पाणीपुरवठाही धड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार करत नाही, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे. रविवारी सकाळी सिंभोरा येथील पंप वीजपुरवठ्याअभावी बंद पडल्याने अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अमरावती शहरात ९० हजारांवर ग्राहक असून त्या पाणीपुरवठ्यावर लाखो अमरावतीकरांची दिनचर्या अवलंबून आहे. पाण्याशिवाय सकाळची सुरुवात कशी करावी, असा प्रश्नच आहे. पाणीबचतीचा मुलमंत्र देणारी मजीप्रा आता एकदिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. ते अमरावतीकरांनी समजून घेतले. मजीप्राला सहकार्य केले. अधूनमधून पाईपलाईनच्या काही कामानिमीत्त पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचेही अमरावतीकर मान्य केले. मात्र, आता पाणीबंदचे नवीन सकंटच पुढे आले आहे. महावितरणाचा विज पुरवठा बंद असला की पाणी पुरवठा बंद होऊ लागला आहे. सिंभोरा धरण परिसरातील विज खंडीत झाल्यावर मजीप्राचे पंपही बंद होतात. तासनतास वीज पुरवठा सुरळित केला जात नाही, ती प्रक्रिया संथ गतीने चालते. परिणामी अमरावतीकर नळात पाणी कधी येईल, या अपेक्षेने प्रतिक्षेतच असतात. मात्र, अमरावतीकरांच्या भावनेशी मजीप्रा व महावितरणला काही देणघेणे नाही. सिंभोरा पंपाला वीज पुरवठा करणाºया महावितरणाला मजीप्रा वर्षाकाठी १२ कोटीची रक्कम देते.

अंबानगरीसाठी शोकांतिकाचत्या मोबदल्यात महाराष्ट्र जीव प्राधिकरणला स्टँडबाय वीजपुरवठा सुविधा द्यावी. तसे केल्यास सिंभोरा धरणावरी पंप काही वेळात पूर्वरत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र, तशी सोयच गेल्या अनेक वर्षांपासून नाही. वीजपुरवठा खंडीत झाला की दुसºया लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याची सोय मजीप्राने वीज वितरणाकडून घेतल्यास हे पाणी संकट दूर होऊ शकते.मात्र, याची दखलच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा महावितरण घेत नसल्याने अमरावतीकरांना, तिन्ही ऋतुमध्ये अशाच पाणी सकंटाला सामोरे जावे लागत आहे. ही अंबानगरीसाठी शोकांतिकाच आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.महावितरणकडून विद्यूत पुरवठा बंद झाला की सिंभोराचे पंप बंद पडतात. परिणामी पाणी पुरवठा बंद होतो. मजीप्रा महावितरणाला दरवर्षाला १२ कोटींचे देयक भरते. त्यांनी स्टँडबाय सुविधा करून वीज पुरवठा सुरू ठेवण्याची सुविधा पुरवायला हवी. आम्हीही तसे प्रयत्न करीत आहोत.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता. मजीप्रा.