शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

परतवाड्यात खांबावरून वीजचोरी

By admin | Updated: June 12, 2015 01:04 IST

विजेची चोरी करण्यासाठी पथदिव्यांच्या खांबावरून वायर टाकून 'अंडरग्राऊंड' केल्याचा प्रकार परतवाडा शहरात उघडकीस आला

साटेलोटे : अधिकाऱ्यांचे उत्तर ‘ते माझे काम नाही’नरेंद्र जावरे ल्ल अचलपूर विजेची चोरी करण्यासाठी पथदिव्यांच्या खांबावरून वायर टाकून 'अंडरग्राऊंड' केल्याचा प्रकार परतवाडा शहरात उघडकीस आला आहे. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने सबब ऐकून घेण्याऐवजी उद्धटपणे उत्तर देऊन एकप्रकारे वीजचोराला अभय देण्याचा प्रयत्न केल्याने या चोरीच्या जिवंत विद्युत तारेमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. परतवाडा-धारणी मार्गावरील गोपालनगर परिसराला लागून झोपडपट्टी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेसुद्धा हाच मार्ग जातो. या रस्त्यावरील विद्युत खांबावरून चोरीचा वीजपुरवठा घेतल्याचे उघडकीस आले. थेट खांबावर चढून वायर जोडणी करण्यात आली आणि तो वायर खांबाच्या सरळ दिशेने खाली आणून जमिनीत पुरण्यात आला व एका नालीद्वारे झोपडपट्टी परिसरात अवैध विद्युतपुरवठा करण्यात आला. वर्दळीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी होत असल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी वजा संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वीजचोरीमुळे विद्युत कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. वीजचोरीचा प्रकार परतवाडा शहरासह तालुक्यात राजरोसपणे सुरु आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.अधिकाऱ्यांचे बेजबाबदारपणा कारणीभूतवीज चोरी कायद्याने गुन्हा सांगणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे उद्धट उत्तर वितरण कंपनीची मान शरमेने खाली घालावयास भाग पाडत आहे. जीवघेणा चोरीचा विद्युत पुरवठा सुरू असल्याची माहिती वजा अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पत्रकारांनी अचलपूर विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांचे दालन गाठले. मात्र ते अमरावती येथे महत्त्वाच्या बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर कार्यालयीन उपकार्यकारी अभियंता महेश कोकाटे यांना वीजचोरीचा हा प्रकार सांगण्यात आला. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले. पुन्हा त्यांना वीज चोरीसंदर्भात माहिती देत हा प्रकार जीवघेणा असल्याने कारवाई करण्याचे सांगितले असता सदर तक्रार आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा असे उत्तर दिले. कार्यकारी अभियंता नसल्यामुळे सदर बाब आपल्या निदर्शनास आणून देण्याचे सांगितल्यावरसुद्धा महेश कोकाटे यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना बोलावून वीज चोरीचा प्रकार पाहण्याची तसदी घेतली नाही.कुठे गेले भरारी पथक ?विद्युत खांबावरील पथदिवे दुरूस्तीसह इतर कामांसाठी कर्मचारी विद्युत खांबावर चढत असताना मुख्य मार्गावरील विद्युत खांबावरून होणारी विद्युत चोरी दिसू नये, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. विश्रामगृह मार्गबिच्छन नदीच्या पात्रालगत असलेला हा मार्ग प्रमुख विश्रामगृहाकडे जातो. तेथील रस्त्यावर मंत्रालयातील अधिकारी व मंत्रीद्वय मात्र विश्रामगृहावर थांबत असल्याने अगदी रस्ता खोदून चोरीचा विद्युतपुरवठा जीवघेणा ठरत आहे.