शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडल्याने भिंतीचे तुकडे दीडशे फुटापर्यंत उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:42 IST

वादळी पाऊसादरम्यान वीज पडून एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची पॅराफीट वॉल तुटून खाली कोसळली, तर भिंतीच्या विटा-सिमेंटचे तुकडे दीडशे फुटांपर्यंत उडून दुसऱ्यांच्या घरात जाऊन पडले.

ठळक मुद्देमोतीनगरातील घटना : अनेक घरातील वीज उपकरणे निकामी, नागरिक धास्तावले

आॅनलाईन लोकमतअमरावती : वादळी पाऊसादरम्यान वीज पडून एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची पॅराफीट वॉल तुटून खाली कोसळली, तर भिंतीच्या विटा-सिमेंटचे तुकडे दीडशे फुटांपर्यंत उडून दुसऱ्यांच्या घरात जाऊन पडले. रविवारी रात्री मोतीनगरात घडलेल्या या थरारक घटनेत विजेच्या अतितिव्र आवाजाने पंधरा मिनिंटापर्यंत नागरिकांच्या कानठळ्या बसल्या होत्या, तर नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. विजेच्या प्रभावाने अनेक घरातील वीज उपकरणे निकामी होऊन लाखो रुपयांचे नुकसानसुध्दा झाले आहे.रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोतीनगर स्थित डहाणे नगरातील रहिवासी रवि मनोहर भुते (२०) यांच्या कुटुंबीयांतील आठ सदस्य रात्री घरात टीव्ही पाहत बसले असताना अचानक वीज कोसळून सर्व परिसर अंधारमय झाला. भुते यांच्या घरावर वीज पडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली. यामध्ये भुते यांच्या घरासह अनेक नागरिकांच्या घरातील वीज उपकरणे निकामी झाले.ग्रीन नेटला छिद्र पाडून प्लास्टिकच्या भांड्याला तडेमोतीनगरातील रहिवासी किशोर निरवान यांच्या घरापर्यंत भुते यांच्या घरावरील विटा-सिमेंटचे तुकडे उडाले. निरवान यांच्या घराच्या आवारातील हिरव्या जाळीला भेदून वीज पडल्याने प्लास्टिकचे भांडेसुध्दा फुटले. तसेच विजेमुळे मनीष इंगळे यांच्यासह अनेक घरांतील टीव्ही, फ्रिज, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक व घरातील विद्युत वायरिंंग जळाली.