शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यात वडनेर भूजंग, कविठा बु. व हनवतखेडा ...

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यात वडनेर भूजंग, कविठा बु. व हनवतखेडा या तीनही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद अविरोध झाले. वज्झर ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीवर बहिष्कार असल्याने तेथे प्रशासक नेमण्यात आला आहे.

तालुक्यात जानेवारी महिन्यात ४४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यात चार ग्रामपंचायती वगळता सर्व ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक झाली. अचलपूर तालुक्यातील वडनेर भूजंग, कविठा बु. व हनवतखेडा ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या आरक्षणानुसार त्या प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने तेथे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करीत सरपंच आरक्षणात बदल केला. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सरपंचपदाच्या अविरोध निवडीत वडनेर भूजंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर प्रीती काळबांडे, कविठा बुजरूक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनल फुंदे, तर हनवतखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर अरुण झाकर्डे यांची अविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांनी दिली.

बॉक्स

वज्झर ग्रामपंचायतीचा पेच

वज्झर ग्रामपंचायतीच्या आठ जागा रिक्त आहेत. परिणामी येथे सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक कोरम पूर्ण नसल्याने होऊ शकली नाही. त्यामुळे येथे सदस्यपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लावला जाणार आहे. परिणामी या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तेथे सर्वाधिक प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असताना १५ वर्षांपासून इतर मागासवर्गीय असे सरपंच आरक्षण येत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.