शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक : जप्तीतील १६ लाख रुपये परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:13 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १८ लाख ७५ हजार ५० रुपयांबाबत आवश्यक दस्ताऐवज सादर केल्याने १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली, तर दीड लाखांची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपडताळणी समितीचा निर्णय : १ लाख ५० हजार रुपये कोषागारात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १८ लाख ७५ हजार ५० रुपयांबाबत आवश्यक दस्ताऐवज सादर केल्याने १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली, तर दीड लाखांची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे.निवडणूक विभागाच्या पडताळणीदरम्यान रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पडताळणी समितीने रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला. संबंधित सहा जणांना जवळपास १४ लाख रूपयांची रक्कम परत करण्यात आल्याचे कोषागार अधिकारी रवींद्र कुमार लिंगनवाड यांनी दिली. १ लाख ५० हजार रुपये अर्जदार हजर राहू न शकल्याने कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने नाकाबंदी दरम्यान विविध ठिकाणी वाहनांची तपासणी गठित करण्यात आलेल्या पथकामार्फत करण्यात आली. २३ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान १० जणांकडून १८ लाख ७५ हजार ५० रुपयाची रक्कम जप्त करून कोषागारात जमा करण्यात आली होती. पडताळणी समितीने १५ एप्रिल रोजी या रकमेवर सुनावणी घेतली. अर्जदारांचे म्हणणे ऐकल्यानंतर सहा जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली. २५ एप्रिल रोजी पुन्हा तिघांची सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी दोघे हजर झाले. मात्र, एक जण हजर राहिला नाही. उपस्थित दोघांनी पडताळणी समितीला आवश्यक दस्ताऐवज सादर केले. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सचिन लोया यांना ३ लाख २८ हजार ५००, सुभाष चंदनखेडे १ लाख, मनोज फिलिप्स ४ लाख २ हजार, हरिदास सोळंके ७१ हजार, प्रकाश गोयनका २ लाख ३० हजार, श्रीकृष्ण दंदे २ लाख, दगडूलाल चव्हाण १ लाख ७५ हजार ८५९, मो. इरफान मो. रफीक १ लाख ५० हजार अशी जवळपास १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली आहे. अन्य एक जण हजर होवू न शकल्याने ही रक्कम कोषागारात जमा असल्याचे कोषागार अधिकार रवींद्र लिंगनवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmravatiअमरावती