कार्यक्रम जाहीर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार याद्या १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आल्यानंतर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुध्दा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक आणि सध्या अशासकीय प्रशासक मंडळ या बाजार समितीवर कामकाज पाहत आहे. त्यामुळे आत्ता जिल्हा प्रशासनाने या बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीसाठी नामनिर्देशन अर्ज (उमेदवारी अर्ज) भरण्याची प्रक्रिया २० जुलैपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज स्वीकारणे २० जुलै ते ३ आॅगस्टप्राप्त अर्जाची यादी प्रसिध्द करणे ३ आगॅस्टनामनिर्देशन पत्राची छाननी करणे ६ आगॅस्ट सकाळी ११ वाजता पासूनअपील दाखल अर्जाची यादी प्रसिध्द करणे २५ आॅगस्टउमेदवारी अर्ज मागे घेणे २७ आॅगस्ट सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंतचिन्ह वाटप ११ वाजतापासून आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी यादी प्रसिध्द करणे २८ आॅगस्टमतदान सकाळी ८ ते ५ पर्यत १३ सप्टेंबरलामतमोजणी १४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता मतदान, मतमोजणीत बदलाची शक्यता?अमरावती बाजार समितीसाठी १३ सप्टेंबर रोजी मतदान आहे. मात्र या दिवशी पोळयाची कर असून रविवारची सुटी असल्याने मतदान हे १५ सप्टेंबरला व मतमोजणी १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला
By admin | Updated: July 21, 2015 00:11 IST