हालचालींना वेग : तिवसा, भातकुली, धारणी, नांदगाव खंडेश्वरमध्ये प्रशासकीय राजवटअमरावती : जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. यामध्ये समाविष्ट चार तालुक्यांच्या मुख्यालयी ‘क’ वर्ग नगरपंचायती स्थापित होणार असल्याने या चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द केल्याचे आदेश कोणत्याहीक्षणी धडकणार आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा २० मार्चनंतर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी १ हजार ७७३ वॉर्डांची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. त्यानुसार या चार ग्रामपंचायती वगळता अन्य ठिकाणी निवडणुकीच्या हालचालींना गती आली आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रापंची तालुकानिहाय संख्या४जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर ५२, चांदूररेल्वे २८, तिवसा २८, धामणगाव रेल्वे ५१, अचलपूर ४०, चांदूरबाजार ४२, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ३४, मोर्शी ३९, वरुड ४१, धारणी ३४, चिखलदरा २० अशी ग्रामपंचायतींची संख्या आहे.
‘त्या’ चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द
By admin | Updated: March 21, 2015 01:05 IST