शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटल व्हिलेज हरिसाल ग्रामपंचायतची निवडणूक

By admin | Updated: February 14, 2016 00:21 IST

देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असणाऱ्या हरिसाल ग्रा.पं. ची रविवार १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.

दोन रिक्त : नऊ जागांकरिता २० उमेदवार रिंगणातधारणी : देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असणाऱ्या हरिसाल ग्रा.पं. ची रविवार १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. एकूण ११ जागांपैकी २ जागांवर उमेदवाराच नसल्याने केवळ ९ जागेसाठी २ हजार ८१ मतदार मतदान करणार आहेत. या ९ जागांकरिता एकूण २० उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये चित्री, बोरी व फैलढाणा या ४ गावांचा समावेश आहे. वार्ड क्रमा १ मध्ये ओबीसी व वॉर्ड क्रमांक ४ मध्ये एससी महिला उमेदवार मिळाल्याने ह्या दोन जागा रिक्त असून वॉर्ड क्रमांक १ मध्ये एस.टी. साठी मदन चिमोटे, फुलाजी कास्देकर, कृष्ण दारसिंबे, काशीराम कास्देकर तर एस.टी. महिलांमध्ये मनीषा भुसूम आपले भाग्य आजमावीत आहेत. वॉर्ड क्रमांक २ मधील एसटीसाठी भाऊ धिकार व श्रीराम सावलकर तर एसटी महिलांसाठी गोपी धुर्वे व सेवंती जामुनकर मैदानात आहेत. वॉर्र्ड क्रमांक ३ मधील एस.टी. करिता राखीव जागेसाठी मदन चिमोटे व हरिराम सावळकर तर ओबीसीकरिता गणपत गायन व गणेश येवले तर एस.टी. महिलांसाठी मनीषा चिमोटे व शेवंती जामुनकर रिंगणात आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील ओबीसी प्रवर्गाकरिता गणपत गायन व अंकुश जोल्हे व एस.टी प्रवर्गाकरिता महिलांसाठी गोपी धुर्वे व लता कास्देकर या भाग्य आजमावित आहेत. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी एसडीओ कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार कृष्णा भामकर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नीलेश राठोड, तहसीलदारर संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत आहेत. डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसालमधील पहिली निवडणूक असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिजिटल व्हिलेजमुळे हरिसाल या गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. याकडे शासनाचे विशेष लक्ष राहणार असून पदाधिकाऱ्यांना प्रकाशझोतात येण्याची ही संधी राहणार आहे.