शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन सीईओंच्या संकेतस्थळाला ‘अपडेशन’चे वावडे

By admin | Updated: February 6, 2017 00:05 IST

नामांकन प्रक्रियेसोबत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आॅनलाईन यंत्रणा राबविण्याचा दावा करणाऱ्या ...

लिंक उघडेना : जुन्याच अधिकाऱ्यांचे नाव कायम अमरावती : नामांकन प्रक्रियेसोबत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आॅनलाईन यंत्रणा राबविण्याचा दावा करणाऱ्या राज्याच्या ‘चिफ इलेक्टोरल आॅफिसर’च्या अधिकृत संकेतस्थळाला अपडेशनचे वावडे असल्याची बाब उघड झाली आहे. जिल्हास्तरावर निवडणुकीविषयक कामकाज हाताळणाऱ्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलीे झाल्यानंतरही त्याच अधिकाऱ्यांची नावे संकेतस्थळावर कायम आहेत.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात निवडणुकीसंदर्भातील संपुर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. कॉप,ट्रु व्होटर यासारखी अ‍ॅपही राज्य निवडणूक आयोगाने ‘लाँच’ केली असून मतदार जनजागृतीसाठी सोशल मिडिया आणि आॅनलाईन यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अर्थात सीईओंच्या ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरील अनेक लिंक एकतर उघडत नाहीत किंवा त्यात सुधारित माहिती उपलब्ध नाही.‘बळकट लोकशाहीसाठी सर्वोच्च सहभाग’अशी टॅगलाईन मिरविणाऱ्या चिफ इलेक्टोरल आॅफिसर’महाराष्ट्र यांच्या या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात संपर्क साधण्यासाठी जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची यादी दिली आहे. यात अमरावती जिल्ह्याच्या नावासमोर कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या विशालकुमार मेश्राम यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र मेश्राम यांची निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून सहा आठ महिन्यापूर्वीच नांदगाव खंडेश्वर एसडीओ म्हणून बदली झाली असताना या संकेतस्थळावर त्यांचेच नाव कायम आहे. टोल फ्री बंद ‘चिफ इलेक्टोरल आॅफिसर’च्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी १८००-२२-१९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.या क्रमांकावर रविवारी संपर्क साधला असता आमचे केंद्र महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह प्रत्येक रविवारी बंद असते ,असे सांगण्यात आले. राज्यात तूर्तास महापालिका आणि जिल्हापरिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणुकीदरम्यान कुणालाही निवडणुकीसंदर्भात माहितीची आवश्यकता भासू शकते, मात्र या टोल फ्री क्रमांकावर रविवार असल्याने केंद्र बंद असल्याचे सांगण्यात येते.