शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

६४८ सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. या तरतुदीनुसार राज्यात कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी १८ मार्च २०२० च्या शासनादेशाप्रमाणे तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देतीन महिने प्रतीक्षा : सप्टेंबरमध्ये सुरू होणार प्राधिकरणाची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आलेला आहे व त्यानंतरही साथ आटोक्यात येण्याची तूर्तास शक्यता नसल्याने शासनाने बुधवारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ६४८ सहकारी संस्थांची निवडणूकदेखील लांबणीवर पडली आहे. सप्टेंबरनंतर याविषयीची प्रक्रिया लागणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. या तरतुदीनुसार राज्यात कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी १८ मार्च २०२० च्या शासनादेशाप्रमाणे तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी हा ३० जूनपर्यंत वाढविलेला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची दररोज नोंद होत आहेत. या संसर्गाला अटकाव करण्यास काही वेळ लागणार आहे. अशावेळी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याचे दृष्टिकोनातून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) मधील तरतुदीनुसार उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे, केवळ अशा सहकारी संस्था वगळून ईतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका १७ जूनपासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी आदेशित केले आहे.राज्यात किमान ४० हजार तर जिल्ह्यात ६४७ सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशामुळे तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याचे सहकारी विभागाने सांगितले. लॉकडाऊनपश्चात उद्भवलेली परिस्थिती, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. या मुदतवाढीनंतर शासनाद्वारे प्राप्त होणाऱ्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.अशी आहे सहकारी संस्थांची वर्गवारीशासनादेशामुळे जिल्ह्यातील ६४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळालेली आहे. यामध्ये राज्य सहकार मंडळ, साखर कारखाने, सूतगिरणी आदी संस्था असणाºया ‘अ’ वर्गवारीतील दोन संस्था, सेवा सहकारी सोसायटी, नागरी सहकारी संस्था तसेच शासकीय अनुदान प्राप्त ‘ब’ वर्गवारीतील ४०५ संस्था, पणन, ग्राहक भांडार, पतसंस्था व एक कोटींच्या आत व्यवहार असलेल्या ‘क’ वर्गवारीतील १६४ संस्था तसेच मजूर संस्था, जंगल कामगार संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, पाणी वापर संस्था आदी ‘ड’ वर्गवारीतील ७७ सहकारी संस्थांचा समावेश आहे.कर्जमाफी प्रक्रियेत यापूर्वी मुदतवाढजिल्ह्यात कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे आदेश असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रक्रियेत व्यस्त आहेत. परिणामी पात्र असलेल्या ५८८ सहकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तसे आदेश सहकार विभागाने जारी केले होते. आता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य आहे. निवडणूक म्हटली की, गर्दी होणार असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे.