शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

अठराविश्वे दारिद्र्यावर मात; मूकबधिर माता-पित्यांचे फेडले पांग

By admin | Updated: June 8, 2015 00:32 IST

इयत्ता दहावी, बारावी अशा दोन्ही परीक्षेत अव्वल ठरल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी ...

धामणगाव रेल्वे : इयत्ता दहावी, बारावी अशा दोन्ही परीक्षेत अव्वल ठरल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी या परीक्षेत २०० पैकी १८२ गुण घेऊन ‘त्याने’ आपल्या अंध माता-पित्यांचे पांग फेडले.ही यशोगाथा आहे हृषीकेश रवींद्र देशमुख या जिद्दी विद्यार्थ्याची. येथील सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल मधून इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याने नेत्रदीपक यश मिळविले. चांदूररेल्वे तालुक्यातील येरड येथील मूळ रहिवासी असलेले हृषीकेशचे वडील रवींद्र व आई संध्या दोघेही मूकबधिर आहेत. केवळ हातवारे आणि इशारे हीच त्यांची बोलीभाषा. त्यात घरात अठराविश्वे दारिद्र्य. परंतु अशाही स्थितीत या दाम्पत्याची मोठी मुलगी पायल पुणे येथील एका महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेत आहे. आता ऋषिकेशने उत्तुंग यश मिळवून माता-पित्यांचे पांग फेडले.मूकबधिर रविंद्र यांनी मुंबई येथील मूकबधिर आयटीआयमध्ये वायरमनचा कोर्स केला. नंतर देवगाव येथील साखर कारखान्यात नोकरीसाठी आले. येथे पाच वर्षे झाल्यानंतर हा कारखाना बंद पडला़ त्यांनी जिद्द न सोडता हातगाव येथे साखर कारखान्यात नोकरी केली. परंतु काही कारणास्तव ही नोकरीदेखील सुटली.आर्थिक अस्थैर्य असूनही त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण दिले. हृषीकेश म्हणतो सेवानिवृत्त शिक्षक असलेले आजोबा गुणवंत हांडे यांचा त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे़ हृषीकेशने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ६५० पैकी ६०९ गुण मिळाले आहे़ त्याच्या यशात राजेंद्र जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. दहावीत संस्कृतमध्ये त्याने पूर्ण पैकी पूर्ण गुण मिळविले. आता सीईटी परीक्षेत २०० पैकी १८२ गुण प्राप्त केले आहे़ ओबीसी गटातून त्याने ९९ वा क्रमांक तर सामान्यांमधून ४३२ वा क्रमांक घेतला आहे़ आपल्या मुलाचे यश पाहून मुकबधिर देशमुख दाम्पत्याला आनंदाश्रू दाटून आले. शब्दांची भाषा ऐकू-बोलू न शकणाऱ्या या दाम्पत्याचा डोळ्यांतून वाहणारे पाणीच त्यांची कहाणी कथन करण्यास पुरेसे होते. उत्साह आणि आनंदाच्या भरात रवींद्र यांनी हातवारे करून आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनविणार, हे सांगितले. गरीब परिस्थिती मूकबधिर माता-पित्यांचे अहोरात्र परिश्रम आणि स्वत:ची जिद्द या बळावर हृषीकेशने मिळविलेले यश खरेच नेत्रदीपक आहे. (तालुका प्रतिनिधी)