शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पेयजलाचे आठ नमुने दूषित

By admin | Updated: April 24, 2017 00:40 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व भागातील पेयजलांची तपासणी करण्यात येत आहे.

महापालिकेची मोहीम : स्वाईन फ्लूची उपाययोजना अमरावती : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व भागातील पेयजलांची तपासणी करण्यात येत आहे. १७ एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या तपासणीत ७० पैकी आठ पाणी नमुने दूषित आढळलेत. त्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ५ मे पर्यंत ही मोहीम राबविली जाईल.शहरात एकीकडे स्वाईन फ्लूने चार बळी घेतले असताना तापाच्या रुग्णातही मोठी वाढ झाली आहे. यातच दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. गृहभेटीदरम्यान झालेल्या सर्वेक्षणात ताप आणि अन्य तापसदृश्य रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील शाळा, हॉटेल, मंगल कार्यालय, पाण्याच्या कॅन्स, लस्सी सेंटर, सार्वजनिक नळ, सार्वजनिक महत्त्वाच्या विहिरींची तपासणी कार्य सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार २१ एप्रिलपर्यंत सुमारे ७० पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील काही कार्यालये आणि कॅनच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे पाणी दूषित आढळून आले आहे. ज्या आठ ठिकाणची पाणी नमुने दूषित आढळलेत. त्या आस्थापनाप्रमुखांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. १७ एप्रिलपासून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली.महापालिकेत आज बैठक अमरावती : राजकमल ते बडनेरा रोड, १८ एप्रिल गांधी चौक ते साईनगर, १९ एप्रिल रोजी राजकमल ते रुख्मिणीनगर व बसस्थानक, २० एप्रिलला राजकमल, राजापेठ व कंवरनगर, २१ एप्रिलला कोर्ट रोड ते दस्तुर नगर चौक, या भागातील पाणी नमुने घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठविले आहे. २४ एप्रिलला राजकमल ते पंचवटी, २५ एप्रिलला पंचवटी ते रहाटगाव, २६ एप्रिलला विलासनगर ते रतनगंज, २७ एप्रिलला नागपुरी गेट ते पठाण चौक, लालखडी, २८ एप्रिलला भाजीबाजार ते हनुमान नगर, २९ एप्रिलला पंचवटी ते व्हिएमव्ही, कठोरा नाका, २ मे रोजी राजापेठ ते शेगाव नाका, ३ मे रोजी चौधरी चौक ते शेगाव नाका, ४ मे रोजी गांधी चौक ते माताखिडकी, महाजनपुरा, कुंभारवाडा व ५ मे रोजी अंबागेट, सराफा व साबनपुरा भागात पाणी तपासणी होणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर उपाययोजनावर शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका सभागृहात स्वाईन फ्लू प्रतिबंधासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. - सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका