शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आठ राष्ट्रीयकृत बँका नापास : अटी शर्र्तींनी शेतकरी गारद, ३० टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या नाहीत. शहरातील एसबीआय कृषी विकास शाखेने ५०० सभासदांना ४ कोटी ५० लाख रुपये कर्ज दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपात आठ राष्ट्रीयकृत बँका नापास ठरल्या. सात बारा दिल्यानंतरही शेत जमिनीचा चतु:सिमा नकाशा बँका मागत आहेत. विविध कागदपत्रांच्या अटी शर्ती शेतकऱ्यांना गारद करणाऱ्या ठरल्या आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० टक्केच कर्ज वाटप तालुक्यातील बँकांनी केले आहे.धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या नाहीत. शहरातील एसबीआय कृषी विकास शाखेने ५०० सभासदांना ४ कोटी ५० लाख रुपये कर्ज दिले. सेंट्रल बँकेने १५० शेतक ऱ्यांना दीड कोटी तर बँक ऑफ महाराष्ट्रने ३१७ शेतकऱ्यांना ४ कोटी ५० लाख १९ हजारांचे पीककर्ज वितरण केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ २०६ शेतकऱ्यांना ९६ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.अंजनसिंगी येथील राष्ट्रीयकृत बँकेने मोजक्या शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. तळेगाव दशासर येथील एसबीआय व देवगावातील बँक ऑफ महाराष्ट्रने त्वरित कर्ज वाटप करावे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर यांनी गरजू शेतकऱ्यांना घेऊन या बँकेत हजेरी लावली. पहिल्या दिवशी मदत करण्याचे मान्य केले असले तरी वीस दिवसात या भागातील शेतकºयांना एक रुपये पिक कर्ज अद्याप मिळाले नाही. या बँकेत शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत. चिंचोली, मंगरूळ दस्तगीर येथील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिरंगाई करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. प्रथम अर्धे कागदपत्र लिहून दिले की दुसरे सांगतात. त्यानंतर पंधरा दिवसांनी बँकेत बोलवतात. मातत कर्ज मिळत नाही.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज