शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

करारनाम्याशी आगळीक काम आठ तास, वेतन चार तासांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:22 IST

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून एका कंत्राटदार संस्थेने संगणक परिचालकांची पिळवणूक चालविली आहे. महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) प्रत्यक्षात आठ तास काम करीत असताना, त्यांना वेतन मात्र चार तासांचे मिळत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेतील जीएडीचा प्रताप : संगणक परिचालकांची पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून एका कंत्राटदार संस्थेने संगणक परिचालकांची पिळवणूक चालविली आहे. महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) प्रत्यक्षात आठ तास काम करीत असताना, त्यांना वेतन मात्र चार तासांचे मिळत आहे. महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाने या पिळवणुकीबाबत सोईस्कर मौन धारण केल्याने शेकडो संगणक परिचालकांमध्ये प्रशासन आणि कंत्राटदार संस्थेबाबत असंतोष पसरला आहे. काम पूर्णवेळ अन् वेतन अर्धवेळचे का, असा या १०८ संगणक परिचालकांचा प्रश्न आहे. जिल्हास्तरावरील कंत्राटी संगणक परिचालकांच्या संघटनांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा महापालिकेतील शोषित संगणक परिचालकांनी व्यक्त केली आहे.आस्थापनेवरील अल्प मनुष्यबळ व बहुतांश लिपिकांचे संगणकाविषयी अज्ञानामुळे यंत्रणेने १०८ संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. महापालिकेला अर्धवेळ, अर्धवेतनी डाटा एन्ट्री आॅपरेटर पुरविण्यासाठी या वर्षीच्या सुरुवातीला निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. ९.४५ ते सायंकाळी ५.४५ असा महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचा ‘ड्युटी टाइम’ आहे. त्या कालावधीत अर्धवेळ अर्थात चार तास संगणक चालविण्याकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती फेब्रुवारी २०१८ पासून हे कंत्राट जानकी सुशिक्षित बेरोजगार संस्थेने मिळविले. महापालिकेत आधीच काम करणाºयांसह आणखी काही नवे चेहरे ‘जानकी’ने महापालिकेला आॅपरेटर म्हणून दिले. सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या माहितीनुसार, जानकी संस्थेला महापालिकेकडून प्रति आॅपरेटर नऊ हजार रुपये मासिक मोबदला दिला जातो. त्यातून २५.६१ टक्के रक्कम इपीएफ, तर ६.५० टक्के रक्कम इएसआयसी कपात करण्यात येते. प्रत्यक्षात संगणक परिचालकांना प्रतिमहिना ६,५५५ रुपये दिले जातात. प्रत्यक्षात देण्यात येणारे मानधन व करारनाम्यानुसार अर्धवेळ काम करणे अपेक्षित असताना त्यांचेकडून आठ तास काम करून घेतले जात आहे.मर्जीतील आॅपरेटरना जादा वेतन ?१०८ आॅपरेटरपैकी मर्जीतील दोन आॅपरेटरना ६५५५ रुपयांपेक्षा अधिकचे मानधन दिले जात असल्याचा आरोप काही आॅपरेटरनी केला आहे. दादा, भाऊंच्या मर्जीसह काही अधिकाºयांची मर्जी सांभाळणाºयांचा यात समावेश असल्याचे काही आॅपरेटरनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. ज्याला एवढ्या पगारात काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल काम सोडून जावे, असा इशारा काही अधिकारी-कर्मचारी देत असल्याने, अल्पशा पगाराची का होईना, नोकरी टिकून राहावी, या भीतीपोटी कुणी बोलायला तयार नाही. मात्र, त्यांच्यात असंतोष उफाळू लागल्याची चिन्हे आहेत.संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) अर्धवेळ पुरविण्याबाबत जानकी संस्थेशी करारनामा करण्यात आला आहे.त्या करारनाम्यात ‘अर्धवेळ -अर्धवेतन’चा अंतर्भाव आहे. निविदा प्रक्रियासुद्धा अर्धवेतनावर अर्धवेळ आॅपरेटर पुरविण्यासाठीच करण्यात आली होती.- दुर्गादास मिसाळ, अधीक्षक सामान्य प्रशासन विभागअर्धवेळ अर्धवेतन असा करारनामा असताना संगणक परिचालक पूर्णवेळ काम करीत आहेत. त्यांना तेवढे वेतन द्यावे, यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र देणार आहोत.- अब्दुल इख्तारजानकी बहुउद्देशीय संस्था