शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

अमरावतीत आठ ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:15 IST

स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.

ठळक मुद्देडॉ.निचत यांचा दावा : डेंग्यू इलायझा पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.इलायझा ही तपासणी डेंग्यू आजाराचे निदान करणारी आहे. त्यामुळे हे आठही रुग्ण डेंग्यूबाधित (डेंग्यू संशयित न समजता) म्हणता येतील, असेही आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात डॉ. निचत यांनी म्हटले. तीन रुग्णांचे प्लेटलेट १० हजारांपर्यंत येऊन त्यांना रक्तस्राव झाला होता. इतर रुग्णांचे प्लेटलेटसुद्धा ५० हजारांपेक्षा कमी झाले आहेत. त्यांची इतर लक्षणे डेंग्यू तापाची आहेत. कोणतेही शासकीय वा खासगी डॉक्टर डेंग्यूची लागण झाली नाही, असे नाकारू शकत नाही, असेही उपचारात पुढे आले आहे.शहरात सात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून, त्यांचे रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरमध्ये तपासण्यासाठी पाठविले आहेत. लवकरच त्याचा अहवालसुद्धा सादर होणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने म्हटले होते. सुदृढ आरोग्यासाठी सतर्क राहण्याचा व डेंग्यूसंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही विभागाने दिला होता.शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणेयवतमाळ मेडिकल कॉलेजलासुद्धा डेंग्यू इलायझा हीच तपासणी करण्यात येते. ही तपासणी साधारणपणे सात दिवसांतच पॉझिटिव्ह येते. शासकीय यंत्रणाद्वारा रक्तनमुने उशिरा घेतले जाणे, शीतसाखळी व्यवस्थित ठेवली न जाणे तसेच रक्तनमुने घेतल्यानंतर तपासणीत सात दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणे, किटचा तुटवडा ही शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणे असू शकतात.डेंग्यूच्या आजाराचा प्रसार हा झपाट्याने होतो व काही रुग्णांना जीवसुद्धा गमवावा लागतो. याशिवाय आजारामुळे खिशावर पडणारा आर्थिक ताण वेगळा. यामुळे या आजाराबद्दलची माहिती प्रशासनाने नागरिकांना देणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी व्यक्त केले आहे.डेंग्यू, हिवताप हे डासांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे, घरातील पाण्याची टाकी, भांडी आदी आठ दिवसांतून एकदा कोरडे करण्याची गरज आहे. शहरातील स्थिती लक्षात घेता, नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.इतर डॉक्टरांकडे तीन डेंग्यूसदृश रूग्णडॉ. निचत यांनी त्यांच्याकडे आठ डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दयासागरमध्ये दाखल दोन व डॉ. अजय डफळे यांच्याकडील एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. म्हणजे, रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल येईलच; परंतु आरोग्य विभागाने रुग्णांच्या घराजवळील नागरिकांचे रक्तनमुनेसुद्धा घेतले आहेत. सतर्कता बाळगावी; मात्र घाबरण्याचे कारण नाही.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिका