शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नियम पूर्ततेसाठी आठ दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:38 IST

खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी व फायर आॅडिटच्या मुद्द्यासह सुरक्षिततेच्या मानकांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांद्वारे गठित समितीने शहरातील ११० वर्गांना नोटीस बजावल्या होत्या. आयुक्तांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिली होती. या मुदतीत फक्त ३५ शिकवणी वर्ग संचालकांनी पत्रव्यवहार केला. आता क्लासेसचे वर्गीकरण करून त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर कठोर कारवाई करू, असे आयुक्तांनी सांगितले.

ठळक मुद्देआयुक्तांची माहिती : कोचिंग क्लासेसच्या वर्गीकरणानंतर कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी व फायर आॅडिटच्या मुद्द्यासह सुरक्षिततेच्या मानकांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांद्वारे गठित समितीने शहरातील ११० वर्गांना नोटीस बजावल्या होत्या. आयुक्तांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिली होती. या मुदतीत फक्त ३५ शिकवणी वर्ग संचालकांनी पत्रव्यवहार केला. आता क्लासेसचे वर्गीकरण करून त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर कठोर कारवाई करू, असे आयुक्तांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गांची तपासणी करण्याचे आदेश २६ मे रोजी सबंधितांना दिले होते. या अनुषंगाने सहआयुक्त (मुख्यालय), सहायक आयुक्त (बाजार व परवाना), नगर रचनाकार, शिक्षणाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख, अग्निशमन अधीक्षक या सहा समिती सदस्यांनी महानगरातील पाहणी केली. कुठल्याच नियमाची अंमलबजावणी या ठिकाणी होत नसल्याचे निदर्शनात आल्याने ११० खासगी शिकवणी वर्गांना नोटीस बजावली.महापालिकेने काही खासगी वर्गांना सील लावल्यानंतर सर्व संचालकांची एकच धावपळ सुरू झाली. महापालिका प्रशासन व संचालक वर्ग यांच्यात झालेल्या दोन बैठकीनंतर ३० जूनच्या आत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करीत असल्याचे मान्य केले व याविषयीचे शपथपत्र मागण्यात आले. मात्र, ३० जूनला फक्त ३५ क्लासेसद्वारे केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. अद्यापही ११० क्लासेसद्वारे महापालिकेच्या तंबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी आयुक्त संजय निपाणे हे बैठकांमध्ये व्यस्त असल्याने मंगळवारी सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांच्या मुदतीनंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.शिकवणी वर्गाद्वारे पळवाटअनेक शिकवणी वर्गांनी फायर आॅडिट केल्याचे नमूद केले, तर काहींनी याविषयीची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेला कळविले. ३० जूनपर्यंत ३५ क्लासेसद्वारे महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, बैठकीत ठरल्याप्रमाणे शपथपत्र काहींनीच दिले आहे. अनेकांनी पळवाटांचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता क्लासेसचे वर्गीकरण करण्यात आल्यानंतर असहकार्य करणाऱ्या क्लासेसवर पुन्हा कारवाई बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त योगेश पिठे यांनी दिली.खासगी शिकवणी वर्गांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर आठ दिवसांची मुदत दिली जाईल. या अवधीमध्ये नियमांची पूर्तता न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.- संजय निपाणेआयुक्त, महापालिका