(प्रादेशिककरिता)
अमरावती : यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील ८,९६३ शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळविण्यासाठी महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले होते. त्यापैकी आठवडाभरात तातडीने ४५९ कृषीे पंपाच्या वीजजोडण्या शेतकऱ्यांना देण्यात आल्या. मात्र, ८,५०४ वीजजोडण्यांचे काम प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर व वीजजोडण्या केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
१ एप्रिल २०१८ नंतर अमरावती जिल्ह्यासाठी महावितरणकडे पैसे भरूनही ३,०१८ वीजजोडण्या प्रलंबित होते, तर यवतमाळ जिल्ह्याकरिता ५,९४५ कृषिपंपांच्या वीजजोडण्यांकरिता शेतकऱ्यांनी अर्ज केले असून तेदेखील प्रलंबित आहेत. १ एप्रिल २०१८ नंतर प्रलंबित वीजजोडण्यांकरिता कुठलीही योजना नव्हती. परंतु अशा ग्राहकांंना वीजजोडणी देण्यासाठी महाकृषी वीजजोडणीसाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० आखले आहे. या धोरणानुसार वीजजोण्या देण्याची प्रक्रिया सुरू झालीे. शासन निर्णायानंतर ३० मीटरच्या आतील ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन आहेत. अशा ४५९ शेतकऱ्यांना नियमानुसार कृषिपंपासाठी वीजजोडण्या देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बॉक्स:
३१ मार्च २०१८ पुर्वीचे धोरण
३१ मार्च २०१८ पुर्वीचे अमरावती जिल्ह्याकरिता ४,३०४ कनेक्शन प्रलंबित होते. त्यापैकी २,६१७ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज प्रणालीनुसार कृषिपंंपांसाठी वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र, उर्वरित १,६८८ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. यवतमाळ जिल्ह्याकरिता ६,६०६ पैकी ३,८९५ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळाले, तर २,७१२ शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या नव्हत्या. त्यांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.