शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

By admin | Updated: March 13, 2016 00:08 IST

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी महापालिकेत आयोजित बैठकीत दिले.

प्रवीण पोटे : महापालिकेत आढावा बैठकअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी महापालिकेत आयोजित बैठकीत दिले. बैठकीला महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.महापालिकेत पालकमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरसेवकांच्या या योजनेसंबंधीचे मत जाणून घेतले. यावेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी योजनेची संपूर्ण माहिती सभागृहाला दिली. योजनेमध्ये अचलपूर पालिकेला व अमरावती मनपाला ही लागू राहील. योजनेचे झोपडपट्टी विकासासह महत्त्वाचे चार उद्देश आहेत. लाभार्र्थ्यांना ३२३ चौ. फुटांचे घर बांधण्यासाठी ६.५ टक्के दराने कर्ज मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील बांधलेल्या घरांचा दर्जा हा चांगला असावा, अशी अपेक्षा व्यक्त करून संपूर्ण देशासाठी पथदर्शी होईल, असे नियोजन करावे. विकासासाठी पक्षीय व राजकीय भेद विसरून एकत्र व्हावे. सर्वांसाठी घरे या योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी दिले.एखाद्या प्रस्तावास नियमावलीचा अडसर येत असेल तर तसा प्रस्ताव पाहिकेने आम्हाला पाठवावा, तो आम्ही शासनाकडे पाठवू, कर्जासाठी किंवा कर्ज परतफेड,बॅँक गॅरंटी यासाठी कुठलाही अर्ज नाकारल्या जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांकडून नगरसेवकांची फिरकी महापालिकेतील सर्व नगरसेवकांना आपण प्रत्येकी ५ लाख दिलेत. मात्र कुणी साधे धन्यवादही दिले नाहीत. अशी फिरकी पालकमंत्र्यांनी घेतली. नगरसेवकांनी त्यासाठी कामाची यादीही दिली नाही, असे पालकमंत्र्यांनी सुनावले, त्यानंतर महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी शुभेच्छा आणि अभिनंदनाची झड लावली.पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इतकी अहमभूमिका लागली की ‘आमसभा करु नका’ अशी तंबी महापौरांनी नगरसेवकांना द्यावी, अशी वेळ येवून ठेपली. त्यावर आपले धन्यवाद पोहोचले आता विषयांकडे वळू, अशी भूमिका पालकमंत्र्यांना घेतली.दरवर्षी ५ लाख द्यावेत एकाच वर्षी नगरसेवकांना प्रत्येकी ५ लाख रुपये देऊन चालणार नाही. त्यामुळे दरवर्षी ५ लाखांची तरतूद डीपीसीमधून करावी, अशी मागणी प्रदीप बाजडासह कांचन ग्रेसपुंजे, इरान अशरफी, भूषण बनसोड आदींनी केली. अटी शिथिल कराव्यात या योजनेतील अटीशर्तीमुळे खऱ्या गरिबापर्यंत ही योजना पोहोचणार नाही. त्यामुळे मुस्लिम बहुल क्षेत्रामधील नागरिकांकडे नसलेला ६/२ व अन्य जाचक अटी शिथिल कराव्यात, यातील भ्रष्टाचार व नाडवणुकीला आळा घ्यावा, दलालांवर कारवाई करावी, अशी सूचना विलास इंगोले, मार्डीकर, चेतन पवार, प्रदीप दंदे, निलीमा काळे, हमीद शद्दा आदींनी केली.