शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा बालवाडीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:46 IST

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे विद्यार्थ्या$ंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तिवसा येथे युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. शिक्षणमंत्री तावडे यांना ‘बालीश’ संबोधून त्यांना नजीकच्या सुरवाडी येथील प्री-प्रायमरीमध्ये प्रतीकात्मक प्रवेश देण्यात आला.

ठळक मुद्देतिवस्यात युवक काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, मुख्याध्यापकांना विनंती करून दिला प्रवेश अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे विद्यार्थ्या$ंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तिवसा येथे युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. शिक्षणमंत्री तावडे यांना ‘बालीश’ संबोधून त्यांना नजीकच्या सुरवाडी येथील प्री-प्रायमरीमध्ये प्रतीकात्मक प्रवेश देण्यात आला.विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे तावडे ‘बालीश’ असल्याने त्यांनी नव्याने नर्सरी (बालवाडी) पासून शिक्षण घ्यावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. तावडे यांचा प्रवेश अर्ज मंगळवारी दुपारी सुरवाडी येथील निर्मल किड्स प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयात मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले.आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय, हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिले होते. त्याचे चित्रीकरण करणाºया अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले होते. सबब, विद्यार्थिविरोधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी राज्यपालांच्या नावे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष वैभव वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रदीप राऊत, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भूषण यावले, काँग्रेस शहराध्यक्ष अतुल देशमुख, सागर राऊत, अतुल गवड, प्रवीण केने, संजय चौधरी, दिवाकर भुरभुरे, आनंद शर्मा, पिंटू राऊत, वैभव काकडे, किसन मुंदाने, प्रसाद लाजुरकरसह कार्यकर्ते उपस्थित होते.