शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

शिक्षण विभागानेच दाखविला शालेय योजनांना ठेंगा

By admin | Updated: March 23, 2015 00:30 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच शिक्षकांच्या मदतनिधीतून १९९७ मध्ये सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रत्येक शिक्षकाने एक हजार रूपयांप्रमाणे निधी जमा केला होता. यातून लाखो रूपयांचा जमा झालेला हा निधी काही कालावधीकरिता शिक्षक बँकेत डिपॉझिट करण्यात आला होता. त्यावर मिळणाऱ्या व्याजातून गरीब व निराधार मुलींना प्रत्येकी ३०० रूपये देण्यात येत होते. याचा जिल्ह्यातील सुमारे २ हजार मुलींना लाभ मिळत होते. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देणे बंद आहे. सदर योजनेसाठी जमा केलेला निधी बँकेत तसाच पडून असल्याची माहिती आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली समितीसुध्दा गठित केली होती. त्यामध्ये शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी व मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यावेळी समितीची सभाही पार पडत होती. मात्र सध्या शिक्षण विभागाने ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवली आहे. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या १०० टक्के पटनोंदणीला पुरस्कार दिला जात असे. याकरिता त्या शाळतील मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकास हा पुरस्कार बहाल केला जात होता. यासाठी केंद्रनिहाय प्रत्येक तालुकास्तरावरून अहवाल मागवून निकषाप्रमाणे अहवाल मागवून यासाठी शाळेची निकष पूर्ण केलेल्या शाळांसाठी हा उपक्रम सुरू आहे. मात्र एकूणच जिल्हा परिषदेच्या या दोन्हीही योजना सध्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्या आहेत. परिणामी या योजनांपासून विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे या बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)