शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

प्राध्यापकांच्या वेतनासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:08 IST

प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून राज्य शासनाने संपकालावधीतील ७१ दिवसांच्या रोखलेल्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने पुढाकार घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षण मंचचा पुढाकार : ७१ दिवसांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून राज्य शासनाने संपकालावधीतील ७१ दिवसांच्या रोखलेल्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने पुढाकार घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालीन प्राध्यापकांनी परीक्षांवर बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु, राज्य शासनाने ७१ दिवसांचे वेतन रोखून प्राध्यापकांवर अन्याय केला होता. हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह संचालकांना ही बाब अवगत करून दिली. महाविद्यालयीन प्राध्यापकांनी न्याय, हक्कासाठी लढा देऊ नये काय, असा सवाल शिक्षण मंचचे प्रदीप खेडकर यांनी शिक्षणमंत्र्यासह वित्तमंत्र्यांसमोर उपस्थित केला.दरम्यान, प्राध्यापकांच्या निवेदनावर प्रतिनिधी मंडळाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली व यासंबंधात संपूर्ण प्राध्यापक वर्गात असंतोष खदखदत असल्याची कल्पना त्यांना दिली. याप्रकरणी कळीचा मुद्दा म्हणजे, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापित तक्रार निवारण समितीची सभा घेऊन सदर शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असल्यामुळे शासनस्तरावर अतितात्काळ योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित असल्याची विनंती करण्यात आली तसेच संपकालावधीत सर्व प्राध्यापकांनी त्यांचे नियमित कामच नव्हे, तर न्यायालयासमोर सादर केलेल्या शपथपत्रानुसार परीक्षांचे कामकाजदेखील वेळेत पूर्ण केल्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. ही वस्तुस्थिती ना. तावडे, ना. मुनगंटीवार यांना पटवून दिली. याप्रश्नी चर्चेसाठी अभ्यासपूर्वक व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी शिक्षक संघटना म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचास आमंत्रित करून हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. मंत्र्यांची भेट करून देण्याची महत्त्वाची भूमिका व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी निभवली.शिष्टमंडळात शिक्षण मंचचे अध्यक्ष तसेच विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रदीप खेडकर, शिक्षण मंचचे अरूण चव्हाण, ओमप्रकाश मुंदे, राजेश गादेवार, राजेश बुरंगे, राधेश्याम चौधरी, अरुण हरणे आदींचा समावेश होता.