शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

अर्ज करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्याबाबत खात्री करून ...

अर्ज करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्याबाबत खात्री करून कृषी विभाग पूर्वसंमती देतो. त्याची पुढारी पायरी म्हणजे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे. या सर्व प्रक्रियेमध्ये त्याला सीएससी सेंटर किंवा सेतु केंद्र यांच्याकडे जावे लागते. या केंद्रामध्ये मात्र त्यांच्या सोयीप्रमाणे शुल्क आकारला जाते. ऑनलाईन अर्जाचे शासकीय शुल्क ही २३ रुपये आहे. परंतु, एका अर्जाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात २०० ते ३०० रुपये खर्च शेतकऱ्याला येतो. त्यातही त्याची सबंधित योजनेत निवड होईलच, याची खात्री नसते. यामुळे शेतकरी वैतागला आहे. शासनाचा हेतु जरी शुद्ध असला तरी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कमी आणि तोटा जास्त सहन करावा लागत आहे. त्यामुळे आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत सेतु, सीएससी सेंटर संचालकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

--------------कृषी विभागाची ही महत्त्वाकांक्षी योजना जरी असली तरी शेतकऱ्याला अर्ज करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो आणि अर्जाची निवड होईल, याची खात्री नसते. सेतु व सीएससी सेंटर यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात एकसूत्रता आणावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही.

- शरद वानखडे (उपसभापती पंचायत समिती, तिवसा)

मी डीबीटीवर प्रमाणित बियाण्यासाठी माझा, माझ्या भावाचा व माझ्या वडिलांच्या नावे एकूण तीन अर्ज केले. प्रत्येकी २०० याप्रमाणे ६०० रुपये खर्च आला. ऑनलाइन लॉटरीमध्ये एकाचाही क्रमांक लागला नाही. माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत. यातून शासनाने काही मार्ग काढावा, जेणेकरून आमचा खर्च कमी होईल.

विनोद बंगरे, शेतकरी