शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदी प्रदेशातील भूस्तरीय हालचालींमुळे मेळघाटात भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:17 IST

तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ‘आयएमडी’शी सातत्याने संपर्क

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडीसह आजूबाजूच्या चार गावांना मंगळवारी रात्री अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपाच्या धक्क््यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, भूकंपाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २१ आॅगस्टला हवामानशास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय चमूला माहिती दिली आणि नेमकी स्थिती समजून घेतली. परत भूकंप होणार की काय, याबाबत सांगणे शक्य नाही. याबाबत मार्गदर्शन व भूस्तरीय हालचालींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी राज्यस्तरावर संबंधित यंत्रणेला कळविल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.तापीचा भूप्रदेश संवेदनशीलमेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदीच्या भूप्रदेशात साद्राबाडी हे गाव वसले आहे. तापी नदीच्या परिसरातील भूगर्भातील ज्या प्लेट्स आहेत, त्यात हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.म्हणून झाली नाही नोंद!भूकंपाची तीव्रता अडीच रिश्टर स्केलपेक्षा जास्त असेल, तरच भूकंपमापक केंद्रावर त्याची नोंद होते. त्यामुळे २१ आॅगस्टला झालेल्या भूकंपाची नोंद झालेली नाही, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर केंद्राचा अहवाल असल्याचे धारणीचे तहसीलदार अभिजित गांजरे यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.नागरिकांनी भूकंपाच्या वेळी त्यांना काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणे गरजेचे आहे. भूकंपाची तीव्रता किती आहे, भूकंपाबाबत भाकित होऊ शकते का, याची माहिती आम्ही आयएमडीकडून मागवित आहोत. ती उपलब्ध होताच उपाययोजना त्वरेने केल्या जातील.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी