शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनाची तस्करी रोखण्यासाठी इअर टॅग

By जितेंद्र दखने | Updated: March 6, 2024 20:45 IST

जिल्ह्यात ५ लाख ९४ हजार पशुधन :  पशूसाठी स्वतंत्र १२ अंकी कोड नंबर.

अमरावती : गोवंशांचे जतन करून त्यांची तस्करी व कत्तल रोखण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवर पाऊल उचलले आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व पशुंचे 'इअर टॅगिंग' करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यापुढे इअर टॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास त्याला शासनाकडून नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही. टॅगिंगमुळे सर्व पशुधनाचा डाटा बेस तयार होणार आहे व तस्कर, अवैध कत्तलीस आळा बसण्यास मदत होणार आहे. 

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये पशुधनाला इअर टॅगिंग केले जाते व त्या पशूचा एक १२ अंकी बारकोड तयार करण्यात येतो. यामुळे त्या पशूच्या जन्म- मृत्यूपासून ते प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार व मालकी हक्कापर्यतची सर्व माहिती उपलब्ध होते. इअर टॅगिंगमुळे पशुंमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगाची त्वरित माहिती मिळणे शक्य होणार आहे. पशुधनातील रोग व मानवी आरोग्याला प्रभावित करणाऱ्या रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या प्रणालीमध्ये गाय वर्ग, म्हैस वर्ग, लहान जनावरे व मोठ्या जनावरांना इअर टॅगिंग करून त्यांची माहिती भारत पशुधन प्रणालीवर भरण्यात येते. यामुळे पशुधनाच्या जन्मापासून ते खरेदी- विक्रीपर्यंत सर्व नोंदींची माहिती उपलब्ध होते. जिल्ह्यात जवळपास सहा लाखांवर पशुधनाचे इअर टॅग करण्यात आले आहे.- डॉ. पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. अमरावती दृष्ट्रीक्षेपात पशुधनाची आकडेवारीगायवर्गीय पशुधन-४ लाख ६४ हजार ९६७म्हैसवर्गीय पशुधन-१ लाख २९ हजार ६२७एकूण पशुधन - ५ लाख ९४ हजार ५९४

टॅग्स :Amravatiअमरावती