शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

अमरावती बाजार समितीत ई-ट्रेडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांना राज्यातीलच नव्हे, तर इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ...

ठळक मुद्दे२५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी : दुसºया टप्प्यात वरोरा पाठोपाठ राज्यात बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना राज्यातीलच नव्हे, तर इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) उपक्रम सुरू केला. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अमरावती बाजार समितीचा समावेश केलेला आहे. सद्यस्थितीत २५ हजार ५८५ शेतकऱ्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमात १६ जानेवारीला ई गेट एंट्रीद्वारे एका महिला शेतकऱ्यांची तूर ई-ट्रेडींग करण्यात येवूण ई-नाम प्रणालीद्वारे पेमेंट केलेले आहे.ई-नाम प्रक्रियेतील कामांबाबत ‘प्राईम मिनिस्टर अवार्ड फॉर एक्सिलन्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिट्रेशन- २०१९’ करिता जिल्हाधिकाºयांच्या पोर्टलवरून भरण्यासाठी निवड झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत १५ जानेवारी होती. मात्र, याला शासनाला मुदतवाढ दिल्याने अमरावती बाजार समिती राष्ट्रीय स्तरावर अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. अमरावती बाजार समितीने ई-नाम कक्ष स्थापित केले आहे. बाजार समितीत होणारी १०० टक्के आवक ई-गेट एंट्रीद्वारे करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीत ई-नाम पोर्टवर २५ हजार ५८५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्यां अडते, खरेदीदारांच्या परवाना नूतनीकरणात ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी, शर्तीमध्ये प्रचंड बदल करण्यात आलेला आहे. या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतमाल विक्रीची रक्कम त्वरित जमा होणार आहे.ई-नाम व प्रचलित बाजारातील फरकई-नाम ही समांतर विपणन संरचना आहे, तर भौतिक बाजारपेठांच्या राष्ट्रीय नेटवर्कला आॅनलाइन पाहण्याचे एक डिव्हाईस आहे. ई-नाम हे पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक्स व्यापार पोर्टल आहे. जे शेतमालाची एकसूत्री भाजारपेठेसाठी बाजार समित्यांचे नेटवर्क तयार करते व सर्व बाजार समित्यांसाठी सेवा पुरविते. यामध्ये इतर सेवांसोबत जिन्नसांची उपलब्धता आणि किती खरेदी व विक्री व्यवहार प्रस्ताव व प्रस्तावाची तरतूद याचा समावेश आहे. या माहितीमधील असमानता कमी होते.बाजार समितीचा कॅम्पस वायफायकेंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ई-नामसाठी अमरावती बाजार समितीची दुसऱ्या टप्प्यात निवड झालेली आहे. यामध्ये एकूण ३० बाजार समित्यांचा समावेश आहे. यासर्व बाजार समित्यांच्या तुलनेत अमरावती बाजार समितीचे काम अव्वल असल्याने राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. याकरिता बाजार समितीचा २३ एकरांच्या परिसरात वायफायची सुविधा आहे. अडते, खरेदीदार, शेतकरी यांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना प्रतिदिन एक जीबी डाटा मोफत मिळणार आहे. यासाठी ‘ई-नाम अ‍ॅप’ डाऊनलोड करावे लागणार आहे.असा झाला ई-नाममध्ये व्यवहारई-नाम योजनेंतर्गत आमरावती बाजार समितीत १६ जानेवारीला लोणी येथील महिला शेतकरी प्रणिता प्रकाश देशमुख यांनी ई-नाम एंट्री करून ६.५० क्विंटल तूर विक्रीकरीता अडते वरेश ट्रेडर्स यांच्याकडे विक्रीसाठी आणली. खरेदीदार गिरीश अग्रवाल यांनी ई-ट्रेडींगद्वारे सर्वाधिक बोली नोंदविली. ई- वेट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार ६९६ रूपये ई-नाम प्रणालीद्वारे जमा करण्यात आले.