शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पहिल्यांदाच ई-टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:48 IST

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना, आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेचा पुढाकार : स्वयंचलित पद्धतीने साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना, आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. शहरात तीन ठिकाणी सहा ई-टॉयलेट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.शहरातील एका स्वयंसेवी संस्थेशी याबाबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. या संस्थेला ई-टॉयलेट बसविण्यासाठी चित्रा चौक, सबनिस फोटो स्टुडिओ व सियाराम शोरूमजवळ राजापेठ येथे जागा देण्यात येणार आहेत. ती संस्था या तीन ठिकाणी स्वखर्चाने ई-टॉयलेट उभारेल. त्यानंतर वीज, पाणी व निचऱ्याचा खर्च महापालिका उचलेल. ई-टॉयलेटची उभारणी पूर्ण झाली की ते ‘पे अँड यूज’ तत्त्वावर अन्य एजन्सीला चालवायला दिले जाईल. शहरात पहिल्यांदाच महापालिका यंत्रणेने ई-टॉयलेट उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही या ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये आहेत. अमरावतीत प्रथमच अशी ई-टॉयलेट उभारली जाणार आहे.असे आहेत ई-टॉयलेटएका ई-टॉयलेटची किंमत साडेतीन ते साडेआठ लाख रुपयांपर्यंत आहे. पे अँड यूजच्या धर्तीवर त्यांचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर प्रसाधनगृहाचा वापर करता येईल. या टॉयलेटसाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. पाचशे लिटर पाणी त्यात साठविलेले असते तसेच एका वेळी दीड लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे ई-टॉयलेट स्वच्छ व यूजर फ्रेंडली असतात.पर्यावरणच्या दृष्टीने उपकारकई-टॉयलेटचा दरवाजा उघडताच आतील दिवे आणि एक्झॉस्ट फॅन सुरू होऊन आपोआप पाणी फ्लश होते. बाहेर पडल्यावरही सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा संपूर्ण शौचालय स्वच्छ होते. या स्वयंचलित शौचालयात बेसीनदेखील असेल. ई-टॉयलेट ही संकल्पना तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्वच्छ भारत अभियानादरम्यान शहर स्वच्छतेकडे हे एक पाऊल आहे.ई-टॉयलेटसंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेशी एमओयू करण्यात आला आहे. त्यासाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्यात. लवकरच ई-टॉयलेटची उभारणी होईल.- हेमंतकुमार पवार, आयुक्त